एसएस राजामौलीचा चित्रपट करणार 1000 कोटींचा आकडा पार, वाचा चित्रपटाची आतापर्यंतची कमाई!

एसएस राजामौलीच्या RRR  या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box office) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आता हा चित्रपट 1000 कोटींचा आकडा गाठणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत आतापर्यंत असे दोन चित्रपट आले आहेत ज्यांनी 1000 कोटींचा गल्ला आपल्या नावावर केला आहे.

एसएस राजामौलीचा चित्रपट करणार 1000 कोटींचा आकडा पार, वाचा चित्रपटाची आतापर्यंतची कमाई!
RRR चित्रपटाचा बाॅक्य आॅफिसवर धुमाकूळ सुरूच
Image Credit source: TV9
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Apr 09, 2022 | 11:07 AM

मुंबई : एसएस राजामौलीच्या RRR  या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box office) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आता हा चित्रपट 1000 कोटींचा आकडा गाठणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत आतापर्यंत असे दोन चित्रपट आले आहेत ज्यांनी 1000 कोटींचा गल्ला आपल्या नावावर केला आहे. बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार आमिर खानचा ‘दंगल’ आणि साऊथचा सुपरस्टार प्रभासचा ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. RRR या चित्रपटाचे 14 व्या दिवशी कलेक्शन 968 कोटी रुपये होते. हा चित्रपट राजामौली (S. S. Rajamouli) यांच्या बाहुबली 2 ला मागे टाकू शकतो असे बोलले जात होते.

RRR चित्रपटाने 12 दिवसांत 900 कोटींचा आकडा पार केला

बाहुबलीच्या जगभरातील कलेक्शनने 1800 कोटींचा टप्पा पार केला होता. RRR चित्रपटाने अवघ्या 12 दिवसांत 900 कोटींचा आकडा पार केला. RRR हिंदीमध्येही भरपूर कमाई करताना दिसतो आहे. RRR च्या कलेक्शनने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा आकडा पार केला आहे, तर इतर भाषांमध्येही चित्रपट चांगला नफा कमावत आहे. अशा स्थितीत हा तिसरा आठवडा या चित्रपटासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, RRR दररोज मोठी कमाई करत आहे.

इथे पाहा तरण आदर्श यांचे ट्विट

वीकेंडला RRR चे कलेक्शन 132 कोटी 59 लाख रुपये होते. दुसऱ्या आठवड्यात RRR चित्रपटाने एकूण 76 कोटींची कमाई केली. दोन आठवड्यात RRR चित्रपटाने 208 कोटी 59 लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. RRR च्या संपूर्ण चित्रपटाचे एकूण कलेक्शन 968 कोटी रुपये झाले आहे. या कामगिरीने RRR चित्रपटाचे चाहते खूप खूश झाले आहेत. सध्या RRR अनेक नवनवीन रेकाॅर्ड आपल्या नावावर करत आहे. चाहत्यांना हा चित्रपट प्रचंड आवडला आहे. विशेष म्हणजे 14 दिवस होऊनही सुध्दा चित्रपटाचे सर्वच शो फूल चालत आहेत.

संबंधित बातम्या : 

Samrenu Marathi Movie : ‘समरेणू’चे शीर्षकगीत प्रदर्शित, प्रेमात पाडणारं शीर्षकगीत

Alia and Ranbir Wedding : रणबीर-आलियाच्या लग्नाची तारीख काय?,नीतू कपूर यांनी दिलं उत्तर, पाहा 32 सेकंदाचा व्हीडिओ…


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें