AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alia and Ranbir Wedding : रणबीर-आलियाच्या लग्नाची तारीख काय?,नीतू कपूर यांनी दिलं उत्तर, पाहा 32 सेकंदाचा व्हीडिओ…

Alia and Ranbir Wedding : मुंबईतील चेंबूर इथल्या आर. के. बंगल्यावर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित रणबीर-आलिया लग्न करतील, अशी माहिती आहे. याच लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. अश्यातच रणबीरची आई नीतू कपूर यांना या दोघांच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी त्याचं उत्तर दिलं. त्याचा 32 सेकंदाचा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय.

Alia and Ranbir Wedding : रणबीर-आलियाच्या लग्नाची तारीख काय?,नीतू कपूर यांनी दिलं उत्तर, पाहा 32 सेकंदाचा व्हीडिओ...
रणबीर कपूर-आलिया भट्ट, नीतू कपूर
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Apr 09, 2022 | 9:10 AM
Share

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) ही बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असणारी जोडी. ते दोघे एकत्र दिसले तरी त्याची चर्चा होते. हे दोघे लवकरच लग्नबंधनात (Ranbir Alia Wedding) अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. रणबीर आणि आलियाने (Ranbir-Alia) लग्नाबाबत अद्याप कोणतीही माहिती दिली नसली तरी 13 ते 17 एप्रिलदरम्यान हे दोघं लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईतील चेंबूर इथल्या आर. के. बंगल्यावर (RK House) मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित रणबीर-आलिया लग्न करतील, अशी माहिती आहे. याच लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. अश्यातच रणबीरची आई नीतू कपूर (Neetu Kapoor) यांना या दोघांच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी त्याचं उत्तर दिलं. त्याचा 32 सेकंदाचा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय.

व्हायरल व्हीडिओ

नीतू कपूर यांनी डान्स दिवाने ज्युनियरच्या लाँचिंग इव्हेंटला हजेरी लावली. या व्हीडिओत नीतू कपूर या हॉलमधून बाहेर येताना दिसत आहे. त्यावेळी त्यांना लग्नाची तारीख काय आहे, असं विचारलं जातं. त्यावर कुणाचं लग्न असा प्रतिसवाल त्या करतात. त्यावर पत्रकार पुढे म्हणतात, की रणबीर आणि आलियाचं लग्न… त्यावर मला काहीच कल्पना नाही असे नीतू कपूर यांचे हावभाव असतात. नंतर ती तिथून निघून जाते. दरम्यान, नीतू कपूर यांनी नुकतीच सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांच्या स्टोअरला भेट दिली.

मुंबईतील चेंबूर इथल्या आर. के. बंगल्यावर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित रणबीर-आलिया लग्न करतील, अशी माहिती आहे याच लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. आलिया आणि रणबीर यांच्या या लग्नसोहळ्याला अयान मुखर्जी, करण जोहर, आदित्य रॉय कपूर, विकी कौशल, कतरिना कैफ, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण उपस्थित असणार असल्याचंही कळतंय. रणबीर-आलियाने नुकतंच त्यांच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली. त्यानंतरच्या प्रोजेक्ट्ससाठी होणाऱ्या शूटिंगच्या तारखाही त्यांनी लग्नसोहळ्याच्या हिशोबाने ठरवल्या असल्याचं समजतंय.

संबंधित बातम्या

राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी लोटण-पाटील यांच्या चित्रपटात प्रिती मल्लापूरकर

Gadad Movie Poster launch : ‘गडद’चं मोशन पोस्टर लाँच, अंडरवॉटर शूट होणारा पहिला मराठी सिनेमा

Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट आहे का? नव्या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी उपस्थित केला प्रश्न

Follow Us
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय घडलं?
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय काय घडलं?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
India Alliance Morcha: दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; संजय राऊतांचा थेट हल्लाबोल, पुढे म्हणाले....
सुधांशू त्रिवेदींचा राहुल गांधींना जोरदार पलटवार; काँग्रेसचा पराभव...
सुधांशू त्रिवेदींचा राहुल गांधींना जोरदार पलटवार; काँग्रेसच्या पराभवांचा इतिहास सांगत उपस्थित केला सवाल!
एकीकडे विद्यार्थ्यांची धरपकड तर, दुसरीकडे लोकशाही वाचवा चा एल्गार...
Mumbai : एकीकडे विद्यार्थ्यांची धरपकड तर, दुसरीकडे लोकशाही वाचवा चा एल्गार; मुंबईत राजकीय वातावरण तापलं
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची दिल्ली पोलिसांसोबत चर्चा सुरु
India Alliance Morcha : राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची दिल्ली पोलिसांसोबत चर्चा सुरु
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणकंदन; राहुल गांधींसह....
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणकंदन; इंडिया आघाडीचा मोर्चा अन् राहुल गांधींसह अनेक खासदार ताब्यात
इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिस...
इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं
पोलिसांनी विरोधकांचा 'लोकशाही वाचवा' मोर्चा थांबवला; विरोधक ठाम
India Alliance Morcha : पोलिसांनी विरोधकांचा 'लोकशाही वाचवा' मोर्चा थांबवला; विरोधक ठाम