AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jacqueline Fernandez | जॅकलिन फर्नांडिसच्या हॉलिवूड चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज, पाहा पोस्ट शेअर करताना जॅकलिनने काय म्हटले!

जॅकलिन फर्नांडिसने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर तिच्या हॉलिवूड चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. तिच्या आगामी हॉलिवूड चित्रपट टेल इट लाइक अ वुमनचे पहिले पोस्टर शेअर करण्यासोबतच तिने सहकलाकार आणि दिग्दर्शकांचे फोटोही शेअर केले आहेत.

Jacqueline Fernandez | जॅकलिन फर्नांडिसच्या हॉलिवूड चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज, पाहा पोस्ट शेअर करताना जॅकलिनने काय म्हटले!
| Updated on: Jul 09, 2022 | 3:46 PM
Share

मुंबई : नुकतेच अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिच्या हॉलिवूड चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. विशेष म्हणजे चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर (Social media) प्रचंड व्हायरल होत आहे. अभिनेत्रीने आज तिच्या हॉलिवूड चित्रपट ‘टेल इट लाईक अ वुमन’ चे पहिले पोस्टर चाहत्यांसोबत शेअर केले. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन आठ महिला चित्रपट निर्मात्यांनी केले आहे. यामुळेच जॅकलीनने इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्टर शेअर करत लिहिले की, या प्रोजेक्टचा एक भाग असल्याचा अभिमान वाटतो.

जॅकलिन फर्नांडिसने शेअर केली इन्स्टाग्रामवर पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143)

इंस्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर केले शेअर

जॅकलिन फर्नांडिसने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर तिच्या हॉलिवूड चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. तिच्या आगामी हॉलिवूड चित्रपट टेल इट लाइक अ वुमनचे पहिले पोस्टर शेअर करण्यासोबतच तिने सहकलाकार आणि दिग्दर्शकांचे फोटोही शेअर केले आहेत. या पोस्टरमध्ये जॅकलीनसोबत मार्गेरिटा बाय, इवा लॉन्गोरिया, कारा डेलेव्हिंगने, एनी वातानाबे, जेनिफर हडसन आणि मार्सिया गे हार्डन देखील दिसत आहेत.

जॅकलिन चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत

पोस्टर शेअर करण्यासोबतच जॅकलिन फर्नांडिसने तिच्या पोस्टसोबत एक कॅप्शनही दिले आहे. कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले आहे की, मला या प्रोजेक्टचा भाग बनवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार, याशिवाय तिने चित्रपटाच्या निर्मात्यांचेही आभार मानले आहेत. जॅकलिन फर्नांडिसच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अलीकडेच अभिनेत्री अक्षय कुमारसोबत बच्चन पांडे या चित्रपटात दिसली होती. याशिवाय ती तिच्या आगामी ‘सर्कस’ या चित्रपटात रणवीर सिंगसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने
हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने.
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले.
मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर
मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर.
मालाड रेल्वेस्थानक हत्या प्रकरण; आरोपीला अटक, काय होणार शिक्षा?
मालाड रेल्वेस्थानक हत्या प्रकरण; आरोपीला अटक, काय होणार शिक्षा?.
डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?
डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?.
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर.
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक.
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.