AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Kashmir Files चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा जामा मस्जिदसमोर नमाज अदा करतानाचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले ‘हा तर दुटप्पीपणा’

विवेक अग्निहोत्री यांचा एक फोटो सध्या वाऱ्यासारखा व्हायरल होतोय. विवेक यांनीच हा फोटो त्यांच्या ट्विटर अकाउंटवर दहा वर्षांपूर्वी शेअर केला होता. त्यांचा फोटो शेअर करत अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

The Kashmir Files चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा जामा मस्जिदसमोर नमाज अदा करतानाचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले 'हा तर दुटप्पीपणा'
The Kashmir Files चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा व्हायरल फोटोImage Credit source: विवेक अग्निहोत्री ट्विटर
| Edited By: | Updated on: Mar 17, 2022 | 12:02 PM
Share

मुंबई : दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री (Director Vivek Agnihotri) यांच्याबाबत सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. त्याचं कारण आहे त्यांचा ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा सिनेमा. सध्या या सिनेमाविषयी सर्वत्र बोललं जातंय. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील बाबींबद्दल जाणून घेण्याविषयीही अनेकांना उत्सुकता आहे. विवेक अग्निहोत्री यांचा एक फोटो सध्या वाऱ्यासारखा व्हायरल होतोय. विवेक यांनीच हा फोटो त्यांच्या ट्विटर अकाउंटवर दहा वर्षांपूर्वी शेअर केला होता. त्यांचा फोटो शेअर करत अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी विवेक अग्निहोत्री दुहेरी भूमिका घेत असल्याचं म्हटलंय. विवेक यांचा ‘द काश्मीर फाईल्स‘ हा सिनेमा काश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांवर आधारित आहे. विवेक हे भाजपचे समर्थक मानले जातात. ते हिंदुत्ववादी विचारसरणीचे असल्याचंही बोललं जातं. अश्यात विवेक यांचा हा डोक्यात गोल टोपी आणि दुआ मागण्यासाठी पुढे आलेले हात हा फोटो अगदी विरूद्ध आहे. त्यामुळे विवेक यांच्यावर टीका होतेय.

विवेक अग्निहोत्री यांचा व्हायरल फोटो

दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांच्याबाबत सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. विवेक यांनी 25 नोव्हेंबर 2012 ला म्हणजेच 10 वर्षांपूर्वी त्यांच्या ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता. यात त्यांच्या डोक्यात मुस्लिम लोक नमाजसाठी परिधान करतात ती गोल टोपी दिसत आहे. तसंच जामा मस्जिदही दिसतेय. विवेक यांनी या फोटोला “At Jama masjid. #Freedom”, असं कॅप्शन दिलं होतं. विवेक हे भाजपचे समर्थक मानले जातात. ते हिंदुत्ववादी विचारसरणीचे असल्याचंही बोललं जातं. अश्यात विवेक यांचा हा डोक्यात गोल टोपी आणि दुआ मागण्यासाठी पुढे आलेले हात हा फोटो अगदी विरूद्ध आहे. त्यामुळे विवेक यांच्यावर टीका होतेय.

नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

10 वर्ष जुना फोटो रिट्विट करत अनेकांनी विवेक अग्निहोत्री यांना कात्रीत पकडलं आहे. एका नेटकऱ्याने “प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात”, असं म्हटलंय.

एका नेटकऱ्याने म्हटलंय की “विवेक अग्निहोत्री 2014 पूर्वी मुस्लिम होते. 2014 नंतर त्यांनी धर्मपरिवर्तन केलं.”

आणखी एक नेटकरी म्हणतो, “अप्रतिम लॉजिक आहे विवेकजी, एकीकडे पंडितांच्या हत्याकांडावर चित्रपट काढला. दुसरीकडे अशी टोपी घालून काय संदेश द्यायचा आहे.”

“हा एक कन्फ्युज माणूस आहे”, असं एक नेटकरी म्हणाला आहे.

“विवेक अग्निहोत्री यांचा आगामी चित्रपट गुजरात फाईल्स असावा”, असं म्हणत एका नेटकऱ्याने त्यांना टोला लगावला आहे.

संबंधित बातम्या

The Kasmir Files : रॉक कॉन्सर्टमध्ये पहिली भेट, तीन वर्ष डेटिंग, 25 वर्षांचा सुखी संसार, वाचा विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांची लव्हस्टोरी…

स्टाईल आयकॉन Kriti Sanon चे हटके स्टाईल टॉप 5 फोटो, तुम्हालाही तिची स्टाईल कॉपी करावीशी वाटेल!

मंत्रिमंडळासह मुख्यमंत्री The Kashmir Files पाहायला, टॅक्स फ्रीची मागणी करणारे पहिले गैर-भाजपशासित राज्य

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.