AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vivek Agnihotri: ‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईवरून विवेक अग्निहोत्रींनी मारला टोमणा; नाराज नेटकरी म्हणाले..

'द काश्मीर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी चित्रपटाच्या कमाईवरून (box office collection) टोला लगावला आहे. त्यांनी ब्रह्मास्त्रच्या कमाईवरून एक ट्विट केलं आहे. या ट्विटवरून उलट नेटकरी त्यांनाच ट्रोल करत आहेत.

Vivek Agnihotri: 'ब्रह्मास्त्र'च्या कमाईवरून विवेक अग्निहोत्रींनी मारला टोमणा; नाराज नेटकरी म्हणाले..
ब्रह्मास्त्रच्या कमाईबाबत ट्विट करणं विवेक अग्निहोत्रींना पडलं महागातImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 11, 2022 | 2:47 PM
Share

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा ‘ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा’ (Brahmastra) हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत जगभरात तब्बल 160 कोटींचा गल्ला जमवला आहे. ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी चित्रपटाच्या कमाईवरून (box office collection) टोला लगावला आहे. त्यांनी ब्रह्मास्त्रच्या कमाईवरून एक ट्विट केलं आहे. या ट्विटवरून उलट नेटकरी त्यांनाच ट्रोल करत आहेत.

विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं, ‘हमको मालूम है जन्नत की हकीकत, लेकिन दिल के खुश रखने को ‘गालिब’ ये खयाल अच्छा है’ (स्वर्गाचं सत्य आम्हाला माहीत आहे, मात्र मनाला खूश ठेवण्यासाठी गालिब यांचे हे विचार चांगले आहेत). यासोबतच त्यांनी ‘बॉलिवूड’ आणि ‘ग्रॉस’ असे दोन हॅशटॅग दिले आहेत. यावरून त्यांनी अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्रला टोला लगावल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे.

‘किती असुरक्षित आहात, इतर चित्रपटांचं यश तुम्ही साजरं केलं पाहिजे’, असं एका युजरने लिहिलं. तर ‘ज्या बॉलिवूडने तुम्हाला विवेक अग्निहोत्री बनवलं, त्याच बॉलिवूडच्या एका चित्रपटाचं यश तुम्हाला पचत नाहीये’, असा टोमणा दुसऱ्या नेटकऱ्याने मारला.

ब्रह्मास्त्र- पार्ट वन शिवा या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट यांच्यासोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. त्याचसोबत शाहरुख खान यामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. तब्बल 410 कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला आहे.

‘ब्रह्मास्त्र’ची जगभरातील कमाई

शुक्रवार- 75 कोटी रुपये शनिवार- 85 कोटी रुपये एकूण- 160 कोटी रुपये

Follow Us
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया.
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?.
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ.