The Kashmir Files चे दिग्दर्शक Vivek Agnihotri यांच्यावर Me Too चे आरोप, सोशल मीडियावर चर्चाच चर्चा!

The Kashmir Files चे दिग्दर्शक Vivek Agnihotri यांच्यावर Me Too चे आरोप, सोशल मीडियावर चर्चाच चर्चा!
विवेक अग्निहोत्री
Image Credit source: TV9

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने 'द काश्मिर फाईल्स' सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर 'मी टू'चे आरोप केले. हे आरोप सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Mar 21, 2022 | 5:40 PM

मुंबई : ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) सिनेमा सध्या जोरदार चर्चेत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) हे देखील अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहेत. त्यांचा सिनेमा बनवतानाचा दृष्टीकोन, त्यांची विचारसरणी यामुळे सध्या ते चर्चेत आलेत. त्यांचा एक टोपी घालून दुआ मागतानाचाही जुना फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. अश्यात त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत. अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) हिने ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर ‘मी टू‘चे (Me Too) आरोप केले.  हे आरोप सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.

तनुश्रीचे आरोप

तनुश्री दत्ताने विवेक अग्निहोत्री यांच्यावर ‘मी टू’चे आरोप केले. हे आरोप सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. तनुश्रीने 2005 मध्ये चॉकलेट सिनेमा केला होता. यावेळी विवेक यांनी आपल्याकडे चुकीच्या गोष्टींची मागणी केल्याचा आरोप तनुश्रीचा आहे. यावेळी अभिनेता इरफान खान आणि सुनिल शेट्टीने आपली बाजू घेतल्याचा दावाही तनुश्रीचा आहे. तिच्या या आरोपांवर विवेक यांनीही स्पष्टीकरण दिलं. तनुश्रीने पब्लिसिटीसाठी हे आरोप केले असल्याचं विवेक यांचं म्हणणं आहे. काही दिवसांआधी तनुश्रीने डीएनए या वृत्तपत्राला एक मुलाखत दिली होती. तेव्हा तिने केलेले आरोप सध्या व्हायरल होत आहेत.

तनुश्रीचे नाना पाटेकर यांच्यावरचे आरोप

काही दिवसांआधी तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावरही आरोप केले होते. 2008 साली ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटासाठी एका स्पेशल गाण्याचे चित्रीकरण सुरू होतं. नाना पाटेकर यांनी या सिनेमाच्या चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसापासूनच माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होते. चित्रीकरणाच्या करारानुसार ते गाणं खरंतर केवळ माझ्या एकटीवर चित्रीत होणं अपेक्षित होतं. मी हा प्रकार दिग्दर्शक आणि निर्मात्यांना सांगितला, पण त्यांनीही मला नाना पाटेकर सांगतील तसं करण्यास सांगितलं, असा खळबळजनक आरोप तनुश्रीने नाना पाटेकरांवर केला होता. सेटवर नाना पाटेकर यांनी माझ्याशी असभ्य वर्तन केलं हे अनेकांनी पाहिलं पण कोणीही माझ्यामागे उभे राहिलं नाही, सगळ्यांनीच यावेळी केवळ बघ्याची भूमिका घेतली, असंही ती म्हणाली होती.

संबंधित बातम्या

Runway 34 trailer: सत्य घटनेवर आधारित अमिताभ बच्चन, अजय देवगण यांचा ‘Runway 34’; पहा उत्कंठावर्धक ट्रेलर

Runway 34 Trailer : रनवे 34 सिनेमाचा ट्रेलर लाँच, कार्यक्रमाला अजय देवगन आणि रकुलप्रीत सिंहचा खास लुक

“एखाद्या व्यक्तीवर अत्याचार होत असेल तर..”; The Kashmir Files वर आमिर खानची प्रतिक्रिया

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें