लग्नबंधन नको रे बाबा! आजही लग्न म्हटलं की दूर पळतात बॉलिवूडचे ‘हे’ दिग्गज कलाकार

बॉलिवूड इंडस्ट्रीशी संबंधित स्टार्स नेहमीच चर्चेत असतात. ते नेहमीच त्यांच्या कामासाठी ओळखले जातात. परंतु, त्यांचे वैयक्तिक जीवन सर्वाधिक प्रकाशझोतात राहते. चाहते त्यांच्या आवडत्या स्टारबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत राहतात.

लग्नबंधन नको रे बाबा! आजही लग्न म्हटलं की दूर पळतात बॉलिवूडचे ‘हे’ दिग्गज कलाकार
Bollywood Celebs

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीशी संबंधित स्टार्स नेहमीच चर्चेत असतात. ते नेहमीच त्यांच्या कामासाठी ओळखले जातात. परंतु, त्यांचे वैयक्तिक जीवन सर्वाधिक प्रकाशझोतात राहते. चाहते त्यांच्या आवडत्या स्टारबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत राहतात. अशा परिस्थितीत जेव्हा त्यांच्या अफेअरची किंवा लग्नाची बातमी समोर येते, तेव्हा लोकांना ती खूप आनंदाने वाचायला आवडते.

पण इंडस्ट्रीमध्ये असे काही सेलेब्स आहेत, ज्यांना आयुष्यात एकटे राहणे आणि लग्नाच्या नावानेच दूर पळून जाणे आवडते. तर आज आम्ही तुम्हाला अशा स्टार्स बद्दल सांगणार आहोत, जे लग्न म्हटलं की लगेचच पळ काढतात..

अक्षय खन्ना

अक्षय खन्नाने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करतो. पण 46 वर्षीय अभिनेत्याचे अद्याप लग्न झालेले नाही. याचे कारण स्पष्ट करताना त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, त्यांना जबाबदाऱ्यांची खूप भीती वाटते.

उदय चोप्रा

उदय चोप्राचे नाव आतापर्यंत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. अभिनेत्याने एके काळी शमिता शेट्टी आणि नर्गिस फाखरीला डेट केले होते. पण, त्याचे कोणतेही नाते विवाहाच्या बंधनापर्यंत पोहोचू शकले नाही. कारण तो स्वतः लग्नाच्या नावाने दूर पळून जातो. उदय चोप्राचा असा विश्वास आहे की, तो आयुष्यात एकटाच आनंदी आहे.

सलमान खान

सलमान खान बॉलिवूडचा सर्वात प्रसिद्ध बॅचलर आहे. त्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे, परंतु आजपर्यंत तो अविवाहितच आहे. मात्र, 55 वर्षीय सलमान खानला अनेकदा प्रश्न विचारला जातो की, तो लग्न कधी करणार? पण अभिनेता हा प्रश्न ऐकून हसू लागतो.

एकता कपूर

एकता कपूर टीव्ही इंडस्ट्रीची राणी आहे. तिने आपल्या कामात खूप नाव कमावले आहे. पण, ती लग्नाच्या प्रकरणापासून दूर राहते. एकता सिंगल मदर आहे. सरोगसीच्या मदतीने तिचा मुलगा रवी याचा जन्म झाला होता. ती सध्या त्याच्या पालनपोषणात व्यस्त आहे.

तुषार कपूर

एकता कपूरप्रमाणेच  तिचा भाऊ आणि अभिनेता तुषार कपूरसुद्धा लग्नापासून दूर राहताना दिसत आहे. तुषार कपूर 44 वर्षांचा आहे, पण आतापर्यंत त्याने लग्न केले नाही. मात्र, सरोगसीच्या मदतीने तो वडील झाला आहे. तुषारच्या मुलाचे नाव लक्ष्य आहे, ज्याचा जन्म 2016 मध्ये सरोगसीद्वारे झाला होता.

करण जोहर

करण जोहरलाही लग्नात रस नाही. त्याला आपला सर्व वेळ त्याच्या कामासाठी आणि त्याच्या दोन्ही मुलांसाठी समर्पित करणे आवडते. करण सरोगसीच्या मदतीने यश आणि रुही या दोन अपत्यांचा पिताही बनला आहे, ज्यांच्यासोबत तो बराच वेळ घालवतो.

हेही वाचा :

Arya Vora : ‘देवों के देव महादेव’ फेम आर्या वोराचा खास लूक, नवरात्रीनिमित्त शेअर केले फोटो

‘जेव्हा स्त्री एखादी गोष्ट करते, तेव्हा प्रश्न उपस्थित केलेच जातात…’, घटस्फोटानंतर समंथाने पोस्ट लिहित व्यक्त केल्या भावना!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI