AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prerna Arora: ‘पॅडमॅन’च्या निर्मात्या प्रेरणा अरोरा यांच्याविरोधात ईडीने दाखल केला गुन्हा, 8 महिन्यांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा अडचणीत वाढ

याआधी प्रेरणा यांनी कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी आठ महिने तुरुंगवास भोगला आहे. 2018 मध्ये त्यांना अटक करण्यात आली आणि त्यानंतर 2019 मध्ये त्यांची जामिनावर सुटका झाली.

Prerna Arora:  'पॅडमॅन'च्या निर्मात्या प्रेरणा अरोरा यांच्याविरोधात ईडीने दाखल केला गुन्हा, 8 महिन्यांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा अडचणीत वाढ
प्रेरणा आरोरा यांच्याविरोधात ईडीने दाखल केला गुन्हाImage Credit source: Filmfare
| Edited By: | Updated on: Jul 20, 2022 | 5:01 PM
Share

कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली तब्बल आठ महिने तुरुंगवास भोगलेल्या चित्रपट निर्मात्या प्रेरणा अरोरा (Prerna Arora) यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. अंमलबजावणी संचलनालयाने (ED) चित्रपट निर्माती प्रेरणा अरोरा यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. ‘पॅडमॅन’, ‘परी’ आणि ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ (Toilet Ek Prem Katha) यांसारख्या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. प्रेरणा अरोरा यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल आहे. आज (बुधवार) ईडीने त्यांना समन्स बजावले होते, मात्र त्या मुंबईत नसल्याने ईडीसमोर हजर राहू शकल्या नाहीत. प्रेरणा यांच्या वतीने त्यांचे वकील ईडी कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी काही वेळ मागितला आहे.

याआधी प्रेरणा यांनी कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी आठ महिने तुरुंगवास भोगला आहे. 2018 मध्ये त्यांना अटक करण्यात आली आणि त्यानंतर 2019 मध्ये त्यांची जामिनावर सुटका झाली. एका मुलाखतीत त्यांनी आपली चूक मान्य केली होती. नव्याने सुरुवात करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर एका मुलाखतीत प्रेरणा म्हणाल्या होत्या की, “मला काय बोलावं तेच समजत नाही. मी खूप मोठी चूक केली आहे, किंबहुना बऱ्याच चुका केल्या आहेत. माझ्यासोबत एखादा मार्गदर्शक असता तर गोष्टी अशा आणि इतक्या बिघडल्या नसत्या. पण आता मी पुन्हा चित्रपटांची निर्मिती सुरू करणार आहे. मला स्थिर व्हायला थोडा वेळ लागेल.”

पैसे परत न केल्याचा आरोप

प्रेरणा यांच्यावर अनेक फायनान्सर्सनी फसवणूक आणि पैसे परत न केल्याचा आरोप केला होता. निर्माते वाशू भगनानी आणि त्यांच्या प्रोडक्शन कंपनीने प्रेरणा विरोधात नोटीस पाठवली होती. वाशू भगनानी यांनी आपल्या तक्रारीत प्रेरणा, त्यांच्या आई आणि क्रिअर्ज एंटरटेनमेंटच्या भागीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. भगनानी यांनी प्रेरणा यांच्याकडे 31.6 कोटी त्वरित परत करण्याची मागणी केली होती.

आरोपपत्रात खुलासा

प्रेरणा यांनी अनेक फायनान्सर्सकडून पैसे घेतल्याचं चार्टशीटमध्ये उघड झालं होतं. एवढंच नाही तर त्यांनी त्या पैशातून सुनील शेट्टीच्या रिअल इस्टेट कंपनीमार्फत 8 कोटींचा बंगला खरेदी केला होता. याशिवाय प्रेरणा यांनी अनेक सोयीसुविधांवर कोट्यवधी रुपये खर्च केले होते.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार