AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vicky Kaushal-Katrina Kaif | लवकरच एकत्र झळकणार विकी-कतरिनाची जोडी, खास प्रोजेक्टसाठी करणार काम!

बॉलिवूड स्टार विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) हे लग्नबंधनात अडकले आहेत. दोघांच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर कल्ला जमवला होता. काही दिवसांपूर्वी हे जोडपे मुंबई विमानतळाबाहेर हातात हात घालून एकत्र दिसले होते.

Vicky Kaushal-Katrina Kaif | लवकरच एकत्र झळकणार विकी-कतरिनाची जोडी, खास प्रोजेक्टसाठी करणार काम!
Vicky-Katrina
| Edited By: | Updated on: Dec 17, 2021 | 11:16 AM
Share

मुंबई : बॉलिवूड स्टार विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) हे लग्नबंधनात अडकले आहेत. दोघांच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर कल्ला जमवला होता. काही दिवसांपूर्वी हे जोडपे मुंबई विमानतळाबाहेर हातात हात घालून एकत्र दिसले होते. विकी आणि कतरिनाची केमिस्ट्री पाहून त्यांचे चाहते खूश झाले होते, तर काही चाहत्यांनी मात्र इतकी चांगली केमिस्ट्री असूनही दोघांनी अजून एकमेकांसोबत काम केले नसल्याबद्दल निराशा व्यक्त केली.

ई-टाइम्सच्या रिपोर्टनुसार, विकी आणि कतरिनाने एकत्र एक नवीन प्रोजेक्ट साइन केला आहे. नवविवाहित जोडपे लवकरच एका जाहिरातीत एकत्र दिसणार आहे. इंडस्ट्रीच्या सूत्रानुसार, विकी आणि कतरिना एका हेल्थ प्रोडक्टच्या शूटमध्ये एकत्र दिसणार आहेत आणि लवकरच त्याचे शूटिंग सुरू करणार आहेत. सूत्रांनी पुढे सांगितले की, विकी आणि कतरिनाने आणखी एका लक्झरी ब्रँडसाठी करार केला आहे.

लग्नानंतर सेलिब्रिटींची ‘हवा’!

मात्र, लग्नानंतर एका जाहिरातीत सेलिब्रिटी कपल एकत्र दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह लग्नानंतरही अनेक जाहिरातींमध्ये एकत्र दिसले आहेत आणि या जोडीला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. अद्याप लग्न न झालेले रणबीर कपूर आणि आलिया भट्ट देखील एकत्र जाहिराती करत आहेत.

विकी आणि कतरिनाचे 9 डिसेंबर रोजी ‘सिक्स सेन्स फोर्ट’ येथे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीमध्ये लग्न झाले. दोघेही नुकतेच हनिमूनहून मुंबईला परतले आहेत. या रॉयल वेडिंगपासूनच या दोघांनी एकत्र कोणत्या ना कोणत्या प्रोजेक्टवर काम करावे, अशी चाहत्यांची इच्छा होती.

कतरिना-विकीकडे नव्या चित्रपटांची रांग

आता सर्वांच्या नजरा कतरिना आणि विकीच्या जाहिरातीकडे लागल्या आहेत. जाहिरातींमध्ये काम केल्यानंतर दोघेही लवकरच एका चित्रपटात एकत्र दिसणार, अशी चाहत्यांना आशा आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, कतरिना ‘टायगर 3’ मध्ये सलमान खानसोबत दिसणार आहे. त्याचबरोबर विकी कौशल ‘द अमर अश्वत्थामा’मध्ये दिसणार आहे. याशिवाय अभिनेता ‘गोविंदा नाम मेरा’मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा :

Miss World 2021 | ‘मिस वर्ल्ड 2021’च्या महाअंतिम सोहळ्यावर कोरोनाचं सावट, मानसा वाराणसीला कोरोनाची लागण!

83 First Movie Review : टीम इंडियाच्या ऐतिहासिक कामगिरीचे सुवर्णक्षण पडद्यावर, 83 इज मास्टरपीस! अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत दमदार कामगिरी

RRR : ज्यांच्या जीवनावर RRR चित्रपट बनला, ते ‘अल्लुरी सीताराम राजू’ आणि ‘कोमाराम भीम कोण होते? जाणून घ्या

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.