AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Deverakonda: असा घडला ‘लायगर’; TV9 चे सीईओ बरुण दास यांच्यासोबत विजय देवरकोंडाची खास मुलाखत

विजयने 17 शहरांमध्ये या चित्रपटाचं प्रमोशन केलं आहे. या प्रत्येक शहरातील प्रमोशनच्या कार्यक्रमात विजयची एक झलक पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vijay Deverakonda: असा घडला 'लायगर'; TV9 चे सीईओ बरुण दास यांच्यासोबत विजय देवरकोंडाची खास मुलाखत
TV9 चे सीईओ बरुण दास यांच्यासोबत विजय देवरकोंडाची खास मुलाखत Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Aug 26, 2022 | 2:54 PM
Share

‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटातील भूमिकेमुळे प्रकाशझोतात आलेला दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आता बॉलिवूडमध्येही चांगलाच प्रसिद्ध आहे. ‘लायगर’ (Liger) या चित्रपटातून त्याने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये त्याने अभिनेत्री अनन्या पांडेसोबत (Ananya Panday) स्क्रीन शेअर केला आहे. संपूर्ण देशभरातील विविध राज्यांमध्ये या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करण्यात आलं. या प्रमोशनदरम्यान विजयचा बॉलिवूडमध्येही मोठा चाहतावर्ग निर्माण झाल्याचं पहायला मिळालं. टीव्ही 9 नेटवर्कचे सीईओ बरूण दास यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत विजयचने बऱ्याच मुद्द्यांवर मोकळपणाने गप्पा मारल्या आहेत.

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’, एस. एस. राजामौली यांचा ‘RRR’, यशचा ‘केजीएफ 2’ यांसारखे दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होत असतानाच आता विजयचा ‘लायगर’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टायमिंगविषयी बोलताना तो म्हणाला, “तेलुगू चित्रपटांसाठी ही नक्कीच चांगली वेळ आहे. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत असून माझ्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. लायगरच्या माध्यमातून आम्ही आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत.” विजयने 17 शहरांमध्ये या चित्रपटाचं प्रमोशन केलं आहे. या प्रत्येक शहरातील प्रमोशनच्या कार्यक्रमात विजयची एक झलक पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “मला चित्रपटाची कथा खूप आवडली आणि त्यामुळेच मी माझे बाकीचे सगळे प्रोजेक्ट्स यासाठी पुढे ढकलले. चित्रपटातील माझा लूक कसा असेल याचं चित्र माझ्या डोळ्यांसमोर होतं. माझ्या ट्रेनरला मी तशा सूचना दिल्या आणि बॉक्सर ॲथलिटच्या लूकसाठी ट्रेनिंग सुरू केली”, असं त्याने सांगितलं. लॉकडाउनमुळे त्याला त्याच्या शरीरयष्टीवर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करता आलं. चित्रपटाच्या पहिल्याच पोस्टरमध्ये तो न्यूड दिसला होता आणि त्याची शरीरयष्टी ही थक्क करणारी होती.

सुरुवातीला असे सीन्स त्याने दिग्दर्शकांना चित्रीत करायला सांगितले, ज्यामध्ये त्याला त्याची शरीरयष्टी दाखवण्याची गरज भासणार नाही. जेव्हा विजय स्वत: आपल्या फिटनेसने समाधानी झाला, तेव्हा त्याने बाकीचे सीन्स शूट करण्यास सुरुवात केली. यासाठी त्याला जवळपास दीड वर्षाचा अवधी लागला. वयाच्या 18 व्या वर्षी विजयला त्याच्या वडिलांच्या मदतीने अभिनयात रस निर्माण झाला. तेलुगू चित्रपटसृष्टीत त्याला सुरुवातीला फारसं कोणी ओळखत नव्हतं. मात्र बॉलिवूड पदार्पण करताना त्याचं नाव देशभरात प्रसिद्ध झालं. करण जोहरने विजयचा ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट पाहिला होता. या चित्रपटातील त्याच्या दमदार अभिनयाने प्रभावित होऊन त्याने ‘लायगर’ची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.

‘लायगर’च्या तेलुगू व्हर्जनचे निर्माते स्क्रिप्ट घेऊन करण जोहरला भेटले. “आम्हाला हा चित्रपट संपूर्ण देशासाठी बनवायचा आहे. तेलुगूमध्ये तो कसा बनवायचा हे आम्हाला माहीत आहे. मात्र हिंदी व्हर्जनसाठी आम्हाला तुमची मदत लागेल”, असं ते करणला म्हणाले. विजयप्रमाणेच करणनेही स्क्रिप्ट वाचताच चित्रपटाला होकार दिला. बॉलिवूड पदार्पणाबद्दल बोलताना विजय म्हणाला, “माझ्यासाठी लोकांना कथा सांगणं महत्त्वाचं आहे. बॉलिवूड हे माझं फोकस नाही तर भारत हे माझं लक्ष्य आहे. जर देशातील प्रेक्षक तुमची कथा पाहण्यास उत्सुक असतील तर तुम्ही संपूर्ण देशाला ती कथा दाखवली पाहिजे. ”

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.