AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vivek Agnihotri: ‘जोपर्यंत बॉलिवूडमध्ये बादशाह, सुलतान असतील तोपर्यंत..’, विवेक अग्निहोत्रींनी सलमान, शाहरुखवर साधला निशाणा

नुकत्याच एका ट्विटमध्ये त्यांनी बॉलिवूडचे सुपरस्टार्स शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि सलमान खान (Salman Khan)यांच्यावर निशाणा साधला आहे. 'शाहरुख खान हा अजूनही बॉलिवूडचा किंग का आहे', अशा आशयाचा लेख एका न्यूज पोर्टलने पब्लिश केला होता.

Vivek Agnihotri: 'जोपर्यंत बॉलिवूडमध्ये बादशाह, सुलतान असतील तोपर्यंत..', विवेक अग्निहोत्रींनी सलमान, शाहरुखवर साधला निशाणा
विवेक अग्निहोत्रींनी सलमान, शाहरुखवर साधला निशाणा Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Jul 15, 2022 | 4:26 PM
Share

‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) हे ट्विटरवर बऱ्यापैकी सक्रिय असतात. विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर ते बेधडकपणे आपली मतं व्यक्त करताना दिसतात. नुकत्याच एका ट्विटमध्ये त्यांनी बॉलिवूडचे सुपरस्टार्स शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि सलमान खान (Salman Khan)यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘शाहरुख खान हा अजूनही बॉलिवूडचा किंग का आहे’, अशा आशयाचा लेख एका न्यूज पोर्टलने पब्लिश केला होता. हाच लेख शेअर करत विवेक यांनी लिहिलं, ‘जोपर्यंत बॉलिवूडमध्ये किंग्ज, बादशाह, सुलतान असतील तोपर्यंत तो बुडतच राहणार. लोकांच्या कथांसह ती लोकांची इंडस्ट्री बनवा, तेच जागतिक चित्रपट उद्योगाचं नेतृत्व करेल.’ या ट्विटच्या शेवटी त्यांनी ‘तथ्य’ असा हॅशटॅग वापरला आहे.

शाहरुखला बॉलिवूडचा किंग म्हटलं जातं, तर ‘सुलतान’ हा सलमानचा चित्रपट आहे. ‘बादशाह’ हेसुद्धा शाहरुखच्या एका चित्रपटाचं नाव आहे. त्यामुळे विवेक अग्निहोत्री यांनी नाव न घेता बॉलिवूडच्या या दोन मोठ्या कलाकारांवर निशाणा साधल्याचं म्हटलं जात आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून विवेक अग्निहोत्री हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. इतकंच नव्हे तर बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने चांगली कामगिरी केली. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी यांसह इतरही नामांकित कलाकारांच्या भूमिका आहेत.

विवेक अग्निहोत्री यांचं ट्विट-

काही दिवसांपूर्वी अग्निहोत्री यांनी अभिनेत्री दिया मिर्झाच्या ट्विटवरही उपरोधिक कमेंट केली होती. ‘लोकांची आणि प्लॅनेटची (पृथ्वी) काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद’, असं दियाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी यांच्यासाठी ट्विटरवर लिहिलं होतं. त्यावर प्रश्न विचार अग्निहोत्रींनी लिहिलं होतं, ‘कोणतं प्लॅनेट? प्लॅनेट बॉलिवूड?’ अग्निहोत्रींच्या या ट्विटवर अनेकांनी हसण्याचे इमोजी पोस्ट केले होते. तर काहींनी दियाची बाजू घेतली होती.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.