बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडलाही पछाडलं; 200 कोटी पार केलेल्या The Kashmir Filesचा असाही विक्रम!

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाची कमाई आता 200 कोटींवर पोहोचली आहे. 11 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या अकराव्या दिवशीच या चित्रपटाने हा विक्रम रचला आहे. द काश्मीर फाईल्सची दुसऱ्या आठवड्याची कमाई ही थक्क करणारी आहे.

बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडलाही पछाडलं; 200 कोटी पार केलेल्या The Kashmir Filesचा असाही विक्रम!
The Kashmir Files overtakes SpidermanImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 3:24 PM

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाची कमाई आता 200 कोटींवर पोहोचली आहे. 11 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या अकराव्या दिवशीच या चित्रपटाने हा विक्रम रचला आहे. द काश्मीर फाईल्सची दुसऱ्या आठवड्याची कमाई ही थक्क करणारी आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाउननंतर प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यात सर्वाधिक करणारा हा चित्रपट ठरला आहे. काश्मिरी पंडितांवरील (Kashmiri Pandit) अत्याचारावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’, रणवीर सिंगचा ’83’ या बॉलिवूड चित्रपटांनाच मागे टाकलं नाही. तर ‘स्पायडरमॅन’सारख्या हॉलिवूड चित्रपटालाही टक्कर दिली आहे. अजूनही या चित्रपटाचे शोज हाऊसफुल आहेत. राधेश्याम, बच्चन पांडे यांसारख्या मोठ्या चित्रपटांचाही त्यावर परिणाम झाला नाही. याउलट द काश्मीर फाईल्सचा फटका अक्षयच्या ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाला बसला आहे.

द काश्मीर फाईल्सची 11 दिवसांची कमाई-

रविवारपर्यंत या चित्रपटाच्या कमाईत सतत वाढ झाल्याचं पहायला मिळालं. मात्र सोमवारच्या कमाईत 50 टक्क्यांची घट पहायला मिळाली. झी स्टुडिओजने ट्विटरवर शेअर केलेल्या पोस्टनुसार, ‘द काश्मीर फाईल्स’ने 11 दिवसांत 206.10 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हा जगभरातील कमाईचा आकडा आहे. 11व्या दिवशी म्हणजेच सोमवारी या चित्रपटाने 13.75 कोटी रुपये कमावले. यापैकी 12.40 कोटी रुपयांची कमाई ही भारतात झाली आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शचं ट्विट-

18 मार्च- 19.15 कोटी रुपये 19 मार्च- 24.80 कोटी रुपये 20 मार्च- 26.20 कोटी रुपये 21 मार्च- 12.40 कोटी रुपये

येत्या 25 मार्च रोजी एस. एस. राजामौली यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित RRR हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ज्युनियर एनटीआर, रामचरण, आलिया भट्ट, अजय देवगण यांसारख्या तगड्या कलाकारांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचा परिणाम ‘द काश्मीर फाईल्स’च्या कमाईवर होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा:

Sana Khanने चाखली 24 कॅरेट सोन्याच्या चहाची चव; किंमत वाचून व्हाल थक्क!

मन सुन्न करणारा The Kashmir Filesचा क्लायमॅक्स सीन असा झाला शूट; अभिनेत्रीला कोसळलं रडू

Non Stop LIVE Update
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.