Sara Ali Khan | सारा अली खानशी लग्न करायचंय? मग, अभिनेत्रीची ‘ही’ अट आधी ऐकाच!

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानला (Sara Ali Khan) आता कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्री भलेही स्टार किड असेल, पण तिने स्वत:ला नेपोटीझमच्या वादापासून पूर्णपणे दूर ठेवले आहे. साराने रणवीर सिंग, अक्षय कुमार, सुशांत सिंह, अक्षय कुमार आणि इतर अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे.

Sara Ali Khan | सारा अली खानशी लग्न करायचंय? मग, अभिनेत्रीची ‘ही’ अट आधी ऐकाच!
Sara Ali Khan

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानला (Sara Ali Khan) आता कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्री भलेही स्टार किड असेल, पण तिने स्वत:ला नेपोटीझमच्या वादापासून पूर्णपणे दूर ठेवले आहे. साराने रणवीर सिंग, अक्षय कुमार, सुशांत सिंह, अक्षय कुमार आणि इतर अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे.

साराचा आगामी ‘अतरंगी रे’ हा चित्रपट काही आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. अशावेळी अभिनेत्रीने पहिल्यांदाच तिच्या लग्नाबद्दल वक्तव केले आहे. इतकेच नाही तर ती कोणत्या मुलाशी लग्न करणार हे देखील सांगितले. अभिनेत्रीने ETimes ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक पैलूंबद्दल सांगितले. साराने तिच्या लग्नाबद्दल बोलताना सांगितले की, ती अशाच व्यक्तीशी लग्न करेल जो, लग्नानंतर तिची आई अमृता सिंहसोबत राहण्यास तयार होईल.

एकट्या आईसोबत राहताना आलेले अनुभव शेअर करायला देखील ही अभिनेत्री कचरत नाही. साराने या चित्रपटातील तिचे पात्र ‘रिंकू’बद्दल सांगितले. या चित्रपटातील रिंकूचा डायलॉग ‘एक बार, एक लडकी को अगर दोनो मिल जाये तो..’ असा आहे. या संवादातून हे सांगायचे आहे की, आजच्या काळात वस्तुस्थिती ही पूर्णपणे विचित्र आणि वेगळी आहे.

‘अतरंगी रे’मधली रिंकू पूर्णपणे ‘अतरंगी’!

सारा ‘रिंकू’बद्दल बोलताना म्हणाली की, हे पात्र तिच्यासाठी पूर्णपणे नवीन आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच ती एकटीच नाचत आहे आणि पहिल्यांदाच उत्तर आणि दक्षिणेतील दोन्ही ‘थलायवां’सोबत काम करत आहे. सारा म्हणते की, ‘आनंद एल राय यांच्या चित्रपटात मी नायिका आहे, जो माझ्यासाठी एक नवीन अनुभव आहे.’

साराने सांगितले की, आनंद जी मला एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये भेटले होते, त्यांनी सांगितले की त्यांना माझ्या चित्रपटासाठी दिग्दर्शन करायचे आहे. त्यानंतर मी त्यांची ही स्क्रिप्ट वाचली आणि मला वाटले की हा चित्रपट करावा.

साराने मागितली माफी!

सारा अली खान सध्या ‘अतरंगी रे’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. ट्रेलरमधील साराची हटके शैली प्रेक्षकांना आवडली. काही दिवसांपूर्वी सारा अली खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर आला होता.

खरं तर, ‘अतरंगी रे’चा ट्रेलर लॉन्च इव्हेंट संपल्यानंतर सारा अली खान कारमध्ये बसली होती, तेव्हा तिला पापाराझींनी घेरले होते. अभिनेत्री कारच्या दिशेने जात असताना एका सुरक्षा रक्षकाने पापाराझींना धक्काबुक्की केली. साराला हे कळताच तिने राग व्यक्त केला आणि पापाराझींची माफी मागितली. तसेच, तिने सुरक्षा रक्षकालाही माफी मागण्यास सांगितले.

हेही वाचा :

Money Heist Season 5 Part 2 | Alicia गेम चेंजर ठरणार की प्रोफेसर पुन्हा एकदा मात देणार? ‘मनी हाईस्ट’च्या शेवटच्या भागात काय घडणार?

Happy Birthday Konkona Sen Sharma | लग्नाआधीच आई होण्याची चाहूल, तब्बल 10 वर्षांनंतर कोंकणा सेन शर्माने मोडला संसार!


Published On - 10:37 am, Fri, 3 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI