AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुखच्या कानाखाली आवाज काढणार होत्या जया बच्चन, ‘थप्पड’चा सलमान खानशी होता थेट संबंध! वाचा किस्सा..

एकदा सलमान खानने (Salman Khan) ऐश्वर्या आणि शाहरुख काम करत असलेल्या चित्रपटाच्या सेटवर जाऊन तमाशा केला होता आणि त्यानंतर ऐश्वर्याने चक्क तो चित्रपट सोडून दिला होता.

शाहरुखच्या कानाखाली आवाज काढणार होत्या जया बच्चन, ‘थप्पड’चा सलमान खानशी होता थेट संबंध! वाचा किस्सा..
शाहरुख खान आणि जया बच्चन
| Edited By: | Updated on: Apr 02, 2021 | 8:21 AM
Share

मुंबई : बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या 3 दशकांपासून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. शाहरुख खान विशेषतः आपल्या रोमँटिक शैलीसाठी ओळखला जातो. किंग खान प्रत्येक भूमिकेसाठी आपली सगळी मेहनत पणाला लावतो. शाहरुख खानने आतापर्यंत अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Roy-Bachchan) ते दीपिका पदुकोण (Deepika Padukone) या यादीतील जवळपास प्रत्येक मोठ्या अभिनेत्रीबरोबर काम केले आहे. शाहरुख खानने ऐश्वर्या रायबरोबर बर्‍याच चित्रपटात काम केले आहे आणि या दोघांची जोडी चाहत्यांनाही खूप आवडली होती (When Jaya Bachchan wants to punish Shah Rukh Khan know the behind story).

‘जोश’, ‘मोहब्बतें’ आणि ‘देवदास’ या सारख्या चित्रपटात ही जोडी एकत्र झळकली होती. या चित्रपटांमधून दोघांनीही आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. एक काळ असा होता की, अभिनेता सलमान खान (Salman Khan) ऐश्वर्या रायवर वेड्यासारखा प्रेम करायचा. ऐश्वर्यासाठी सलमान थेट शाहरुख खानशीही पंगा घेतला होता. एकवेळ अशी होती की ऐश्वर्याची सासू अर्थात अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांना शाहरुख खानच्या कानाखाली आवाज काढण्याची इच्छा झाली होती.

शाहरुखने ऐश्वर्या सुनावले होते खडे बोल!

एकदा सलमान खानने (Salman Khan) ऐश्वर्या आणि शाहरुख काम करत असलेल्या चित्रपटाच्या सेटवर जाऊन तमाशा केला होता आणि त्यानंतर ऐश्वर्याने चक्क तो चित्रपट सोडून दिला होता. त्यावेळी शाहरुखने ऐश्वर्याला पाठिंबा दिला होता. पण, नंतर त्याने ऐश्वर्याला काही खडे बोल सुनावले होते, त्यावेळी ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केले होते (When Jaya Bachchan wants to punish Shah Rukh Khan know the behind story).

असे म्हटले जाते की, ऐश्वर्याची सासू अर्थात अभिनेत्री जया बच्चन त्यावेळी शाहरुख खानवर प्रचंड संतापली होती आणि ती शाहरुखला कानाखाली मारणार होती. शाहरुख आणि जया बच्चनने करण जोहरचा चित्रपट ‘कभी खुशी कभी गम’मध्ये एकत्र काम केले आहे. या चित्रपटात जया बच्चन, शाहरुख खानच्या आईच्या भूमिकेत दिसली होती. एकदा, पीपल्स मासिकाला दिलेल्या मुलाखतीत, जया बच्चन यांनी शाहरुखवर नाराजी व्यक्त केली होती. या मुलाखती दरम्यान त्या म्हणाल्या की, ‘हो मी शाहरुखच्या कानाखाली मारले असते, पण आतापर्यंत मला त्याच्याशी नीट बोलण्याची संधी देखील मिळाली नाहीय. मी माझ्या मुलाला चापट मारते, त्याचप्रमाणे मी त्यालादेखील चापट मारणार, शाहरुखशी माझा खूप जवळचा संबंध आहे.’

जयाने शाहरुखवर साधला निशाणा

जया बच्चन यांनी एका चित्रपटादरम्यान शाहरुखवर टीका केली होती. जेव्हा शाहरुख खानचा चित्रपट ‘हॅपी न्यू इयर’ हा चित्रपट रिलीज झाला, तेव्हा जया बच्चन यांनी अभिनेत्याला लक्ष्य केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, ‘हा एक अतिशय मूर्खपणाचा कळस असलेला चित्रपट आहे. जर या चित्रपटाला माझा मुलगा अभिषेक बच्चन नसता, तर मी हा चित्रपट कधीच पाहिला नसता’.  विशेष म्हणजे या चित्रपटात अभिषेक बच्चनही शाहरुखसोबत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला होता.

(When Jaya Bachchan wants to punish Shah Rukh Khan know the behind story)

हेही वाचा :

Video | Indian Idol 12च्या मंचावर रेखाला आली अमिताभ बच्चनची आठवण, ‘मुकद्दर’च्या गाण्यावर केली बिग बींची नक्कल!

Photo : ‘फुलराणी… अविस्मरणीय प्रेमकहाणी’,चित्रपटाच्या माध्यमातून दरवळणार प्रेमाचा नवा सुगंध

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.