पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला, नंतर अचानक गायब झाली रणबीरची अभिनेत्री, जीवघेण्या आजाराशीही दिली होती झुंज!  

बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी (Nargis Fakhri) हिने आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रचंड प्रसिद्धी कमावली होती. प्रत्येकजण नर्गिसच्या सौंदर्यावर फिदा झाला होता.

पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला, नंतर अचानक गायब झाली रणबीरची अभिनेत्री, जीवघेण्या आजाराशीही दिली होती झुंज!  
नर्गिस फाखरी
Follow us
| Updated on: May 25, 2021 | 9:21 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी (Nargis Fakhri) हिने आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रचंड प्रसिद्धी कमावली होती. प्रत्येकजण नर्गिसच्या सौंदर्यावर फिदा झाला होता. पहिल्या चित्रपटात नर्गिसने बोल्ड दृश्ये देणेही टाळले नाही. ‘रॉकस्टार’ या पहिल्याच चित्रपटाने तिला रातोरात सुपरस्टार बनवले होते. पण अभिनेत्रीचा हा स्टारडम फार काळ टिकू शकला नाही. पहिल्या चित्रपटापासून अभिनेत्रीने सर्वांना वेड लावले असेल, परंतु हळू हळू ती चित्रपट विश्वापासून दूर गेली आणि आज ती मनोरंजन विश्वातून जवळपास गायब झाली आहे (Why Actress Nargis Fakhri disappear from Bollywood know the reason).

सध्या नर्गिस कुठे आहे आणि काय करते, हे जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना नेहमीच असते. सध्या नर्गिस चित्रपट विश्वापासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.

मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात

‘रॉकस्टार गर्ल’ नर्गिसने वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी मॉडेल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर, 2004 मध्ये, ती अमेरिका नेक्स्ट टॉप मॉडेलमध्ये देखील दिसली होती. त्यानंतर, नर्गिस 2009 मध्ये किंगफिशर कॅलेंडरमध्ये देखील दिसली होती आणि यानंतरच तिच्या कारकिर्दीला एक नवी दिशा मिळाली.

किंगफिशर कॅलेंडरने चित्रपटापर्यंत पोहोचवले

किंगफिशर कॅलेंडरमध्ये आपली छाप पाडल्यानंतर नर्गिस फाखरी हिला 2011 मध्ये ‘रॉकस्टार’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण फिल्म फेअर अवॉर्डसाठीही नामांकन मिळाले होते. यानंतर, नर्गिस ‘मद्रास कॅफे’, ‘मैं तेरा हीरो’ आणि ‘हाऊसफुल 3’सारख्या चित्रपटांमध्ये देखील दिसली (Why Actress Nargis Fakhri disappear from Bollywood know the reason).

शेवटचे प्रोजेक्ट

अभिनेत्री नर्गिस फाखरीला शेवटच्या वेळी, 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अमावस’ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास जादू दाखवू शकला नसला, तरी आता ‘तोरबाज’ चित्रपटात नर्गिस फाखरी दिसू शकते.

नर्गिसच्या लिंकअपची चर्चा

पहिल्याच चित्रपटात को-स्टार रणबीर कपूर याच्याशी तिच्या लिंकअपची चर्चाही समोर आली होती. मात्र, नंतर दोघांनीही यातून माघार घेतली. यानंतर अभिनेता उदय चोप्रावर नर्गिस भाळली होती. या दोघांनीही कधीही उघडपणे आपलं नातं स्वीकारलं नाही, पण असं म्हणतात की दोघांनी एकमेकांना जवळपास 2 वर्ष डेट केलं होतं. तथापि, या दोघांचा अचानक ब्रेकअप झाला. असे म्हटले जाते की, उदयने व्हॉट्सअ‍ॅपवरच नर्गिसबरोबर ब्रेकअप केला होता.

‘या’ आजाराने होती त्रस्त!

उदय सोबतच्या ब्रेकअपनंतर अभिनेत्री मनाने पूर्णपणे तुटली होती, ती इतकी नाराज झाली होती की, त्याच रात्री ती देश सोडून न्यूयॉर्कला निघून गेली. नर्गिसने देश का सोडला, याचा खुअलासा स्वतः नर्गिसने केला होता. या अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार तिला एक गंभीर आजार झाला होता. तिला आर्सेनिक आणि लीड पॉयजनिंग झाले होते. माध्यमांच्या वृत्तानुसार, सध्या नर्गिस ही जस्टीन सॅन्टोस याला डेट करत आहे. तर सध्या नर्गिस कॅलिफोर्नियामध्ये राहते, तर जस्टिन न्यूयॉर्कमध्ये राहते आहे. तथापि, दोघे एकमेकांना भेटण्यासाठी वेळ काढत असतात.

(Why Actress Nargis Fakhri disappear from Bollywood know the reason)

हेही वाचा :

अशी आहे सुष्मिता सेनच्या लेकीची ‘लव्ह लाईफ’, ‘बॉयफ्रेंड कोण’? चाहत्याच्या प्रश्नावर उत्तरे देताना म्हणते…

Photo : अक्षय कुमारसारखा दिसणारा ‘हा’ व्यक्ती आहे सुनिल गावस्करांचा मोठा फॅन, फोटो पाहून तुम्हीही व्हाल चकित

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.