Yami Gautam : यामी गौतमनं शेअर केला खास व्हिडीओ, चाहते म्हणाले सुंदर वधू…

यामीनं कलिरे सोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिची बहीण सुरीली आहे. (Yami Gautam shared a special video from wedding Ceremony fans said beautiful bride ...)

Yami Gautam : यामी गौतमनं शेअर केला खास व्हिडीओ, चाहते म्हणाले सुंदर वधू...

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमनं (Yami Gautam) नुकतंच चित्रपट निर्माता आदित्य धर याच्याशी लग्न बंधनात अडकली. आता गेले अनेक दिवस ती चाहत्यांसाठी लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतेय. यामीचे फोटो आणि व्हिडीओ तिच्या चाहत्यांच्या पसंतीसही उतरत आहेत. यामीनं कलिरे सोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिची बहीण सुरीली दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Yami Gautam (@yamigautam)

या व्हिडीओमध्ये यामीनं लाल रंगाची साडी परिधान केली आहे. तिची बहीण तिला बांगड्या परिधान करतेय. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

हा व्हिडीओ शेअर करताना यामीने तिच्या बहिणीला टॅग केलंय. अनेक सेलिब्रिटींनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपनंही या व्हिडीओवर कमेंट केली आहे. तिनं हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. तिचा हा व्हिडीओ यामीच्या चाहत्यांना खूप आवडतोय. एका नेटकऱ्यानं लिहिलं – सुंदर क्षण. दुसर्‍यानं लिहिलं आहे – सुंदर वधू.

नेसलेली साडी 33 वर्ष जूनी

यामी गौतम तिच्या लग्नात खूपच सुंदर दिसत होती. लग्नात तिनं आपल्या आईची 33 वर्ष जूनी पारंपारिक रेशमी साडी परिधान केली होती. यामीनं साडीसोबत आजीनं दिलेला लाल दुपट्टा परिधान केला होता. यामीने खूप कमी मेकअप केलं होतं. तिने स्वत:चे मेक-अप स्वत: केलं आणि तिची हेअरस्टाईल बहीण सुरीलीनं केली. यामीच्या या साध्या लूकनं तिच्या चाहत्यांच्या मनाला स्पर्श केला आहे.

यामी आणि आदित्यचं लग्न त्यांच्या गावी झालं. लग्नात फक्त त्याच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. यामी आणि आदित्यनं त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. विक्की कौशल, कंगना रनौत, आयुष्मान खुराना, विक्रांत मेसी यांच्यासह अनेक सेलेब्सनी तिला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.

संबंधित बातम्या

Ankita Lokhande : सुशांतच्या पुण्यतिथीच्या एक दिवस आधी अंकिता लोखंडेनं शेअर केला खास फोटो, लिहिलं ‘अंतरानं काही फरक पडत नाही कारण …’

Haseen Dillruba Review : ‘हसीन दिलरुबा’चा ट्रेलर प्रदर्शित, सुंदर कथानक आणि हटके स्टारकास्टसह परफेक्ट मर्डर मिस्ट्री तुमच्या भेटीला…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI