AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समोरच दुर्घटना घडली, ऊर्वशी रौतेलाला दरदरून घाम फुटला, केक कापणार तोच आग भडकली अन्…

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री ऊर्वशी रौतेला हिच्यासमोरच एक दुर्घटना होताना टळली आहे. केक कापत असताना पेटवलेल्या मेणबत्तीच्या आगीचा भडका उडाल्याने एका तरुणीचे केस जळाले आहेत.

समोरच दुर्घटना घडली, ऊर्वशी रौतेलाला दरदरून घाम फुटला, केक कापणार तोच आग भडकली अन्...
urvashi rautela Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 08, 2023 | 8:36 AM
Share

जयपूर : बॉलिवूडची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री ऊर्वशी रौतेला समोर एक मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. ऊर्वशीने तिच्या चाहत्यांसोबत सेल्फी घेतला. पोझ दिल्या. त्यानंतर केक कापण्यास घेतला तेव्हा आगीचा भडका उडाला. बाजूलाच असलेल्या एका तरुणीच्या चेहऱ्यापर्यंत ही आग गेली. नशीब बलवत्तर म्हणून ही मुलगी बचावली. आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असती तर होत्याचं नव्हतं झालं असतं. मात्र, सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र, या प्रकारामुळे काही वेळ सर्वच घाबरून गेले होते. सर्वांचीच धावपळ उडाली होती. स्वत: ऊर्वशीलाही दरदरून घाम फुटला होता.

ऊर्वशी रौतेला नुकतीच जयपूरला आली होती. एका फॅशन आणि ग्लॅमर अकादमीच्या लॉन्चसाठी ती जयपूरला आली होती. ऊर्वशी येणार म्हटल्यावर तिला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांची एकच झुंबड उडाली होती. यावेळी ऊर्वशीने चाहत्यांसोबत सेल्फी काढले. तिने फोटोग्राफरला पोझही दिल्या. ऊर्वशी सोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली. पण तरीही ऊर्वशीने त्यांना निराश केलं नाही. जमेल तेवढ्या फॅनसोबत तिने फोटो काढले.

ऊर्वशीही घाबरली

ऊर्वशी रौतेलाने फॅन्स सोबत फोटो काढले. त्यानंतर ऊर्वशी सर्वांसोबत केक कापत होती. तिच्या भोवती चाहत्यांचा गराडा पडला होता. त्यावेळी मेणबत्ती लावत असताना आग भडकली. बाजूलाच असलेल्या एका मुलीच्या चेहऱ्यापर्यंत ही आगीची झळ गेली. त्यामुळे या तरुणीचे केस जळाले. नशीब बलवत्तर म्हणून तिचा चेहरा भाजला नाही. तिच्या कपड्यानेही पेट घेतला नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या तरुणीचे केस जळाल्याने ऊर्वशीही घाबरली. या तरुणीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. या तरुणीला रुग्णालयात नेल्यानंतर ऊर्वशीने तिला फोन केला. तिच्या प्रकृतीची विचारपूसही केली.

ऊर्वशीच्या पर्सनल लाईफबाबत अनेक चर्चा होतात. क्रिकेटपटू ऋषभ पंतसोबत तिचं नाव जोडलं गेलंय. दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, दोघांकडून त्याबाबत कोणतंही अधिकृत भाष्य केलं गेलं नाहीये. दोघांमध्ये मैत्री आहे की रिलेशनशीप यावर या दोघांनीही भाष्य केलेलं नाही. काही दिवसांपूर्वी ऋषभ पंतचा अपघात झाला होता. त्यावेळी ऊर्वशी चर्चेत आली होती. ऋषभ पंत मुंबईत रुग्णालयात उपचार घेत होता. त्यावेळी त्याला भेटण्यासाठी ऊर्वशीची आई गेली होती. तसेच ऋषभ बरा व्हावा म्हणून संपूर्ण कुटुंब प्रार्थना करत असल्याचं ऊर्वशीने म्हटलं होतं. त्यामुळे तिच्या ऋषभ बरोबरच्या अफेअरची चर्चा सुरू झाली होती.

ऊर्वशी लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ऊर्वशी 365 डेजचे स्टार Michele Morrone यांच्यासोबत दिसणार आहे. या शिवाय इन्स्पेक्टर अविनाश या सिनेमात ती रणदीप हुडा सोबत काम करणार आहे. ब्लॅक रोज या सिनेमातही ती काम करणार आहे. साऊथच्या Thiruttu Payale 2 च्या हिंदी रिमेकमध्येही ती दिसणार आहे. तिच्या या सिनेमाची तिचे चाहते आतूरतेने वाट पाहत आहेत.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.