AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लंडनहून येताच या अभिनेत्रीने बॉलिवूड गाजवलं, दिले फक्त 7 चित्रपट, 27 मार्च रोजी झालेली हत्या, कोण आहे ही अभिनेत्री?

एका फोटोमुळे बदललं नशीब, थेट लंडनहून आली बॉलिवूडमध्ये. करिअरमध्ये दिले फक्त 7 चित्रपट. प्रेक्षकांच्या मनावर केलं राज्य. पण अचानक झाली हत्या. कोण आहे ती अभिनेत्री?

लंडनहून येताच या अभिनेत्रीने बॉलिवूड गाजवलं, दिले फक्त 7 चित्रपट, 27 मार्च रोजी झालेली हत्या, कोण आहे ही अभिनेत्री?
| Updated on: Mar 27, 2026 | 12:20 PM
Share

Bollywood Actress : हिंदी चित्रपटसृष्टीत काही कलाकार असे आहेत, ज्यांनी फार कमी काम केलं, पण प्रेक्षकांच्या मनात कायमची जागा निर्माण केली. दिवंगत अभिनेत्री प्रिया राजवंश या त्यापैकीच एक होत्या. केवळ सात चित्रपटांच्या जोरावर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. 27 मार्च 2000 रोजी त्यांचं निधन झालं. मात्र त्यांच्या मृत्यूभोवती आजही गूढ कायम आहे.

30 डिसेंबर 1936 रोजी हिमाचल प्रदेशातील शिमला येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव वीरा सुंदर सिंह होतं. वडील सरकारी अधिकारी असल्याने घराण्याचा चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नव्हता. शिमल्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या अभिनय शिकण्यासाठी लंडनला गेल्या.

लंडनमध्येच त्यांच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉइंट आला. एका फोटोग्राफरने काढलेल्या त्यांच्या फोटोमुळे त्या थेट भारतीय चित्रपटसृष्टीपर्यंत पोहोचल्या. दिग्गज दिग्दर्शक चेतन आनंद यांनी त्यांचे फोटो पाहिले आणि आपल्या ‘हकीकत’ या चित्रपटात संधी दिली. हा चित्रपट हिट ठरला आणि प्रिया राजवंश एका रात्रीत स्टार बनल्या.

फक्त 7 चित्रपट

प्रिया राजवंश यांनी आपल्या कारकिर्दीत फक्त 7 चित्रपट केले. प्रत्येक चित्रपटात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आणि त्या पूर्ण प्रामाणिकपणे साकारल्यामुळे प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी स्थान मिळवलं.

त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांनी बहुतांश चित्रपट चेतन आनंद यांच्यासोबतच केले. काम करताना दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांचं नातं प्रेमात बदललं. दोघेही अनेक वर्षे लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहिले. मात्र त्यांनी कधीच लग्न केलं नाही. या नात्याचा त्यांच्या करिअरवरही परिणाम झाला. कारण त्यांनी इतर दिग्दर्शकांसोबत फारसं काम केलं नाही.

एकाकी आयुष्य आणि मृत्यू

1997 मध्ये चेतन आनंद यांचं निधन झाल्यानंतर प्रिया राजवंश पूर्णपणे एकट्या पडल्या. त्यांनी स्वतःला चित्रपटसृष्टीपासून दूर केलं. 27 मार्च 2000 रोजी त्या त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळल्या. तपासात समोर आलं की, त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात काही लोकांना अटकही करण्यात आली. मात्र ठोस पुराव्याअभावी गुन्हा पूर्णपणे सिद्ध होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचं गूढ आजही कायम आहे.

प्रिया राजवंश यांनी कमी चित्रपट देऊन देखील आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या अभिनयातील नैसर्गिकता, सौंदर्य आणि भावनिक सादरीकरण यामुळे त्या आजही चाहते त्यांची आठवण काढतात.

Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत