AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“फक्त स्पॉट दादा सोडून सर्वांसोबत…”, प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

प्रसिद्ध अभिनेत्री चाहत खन्ना यांनी बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवांबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी सांगितले की, दक्षिणेतील सिनेसृष्टीत हे प्रकरणे अगदी उघडपणे घडतात आणि काही करारांमध्ये याचा थेट उल्लेखही असतो.

फक्त स्पॉट दादा सोडून सर्वांसोबत..., प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
chahatt khanna
| Updated on: Apr 11, 2025 | 8:40 PM
Share

सिनेसृष्टीत कायमच कास्टिंग काऊचबद्दल चर्चा होताना दिसते. बॉलिवूडसह हॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी आतापर्यंत कास्टिंग काऊचबद्दल उघडपणे वक्तव्य केले आहे. त्यातच आता आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री चाहत खन्नाने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत कास्टिंग काऊचच्या अनुभवांबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत कास्टिंग काऊच हे सर्रास केले जाते. काही वेळा तर करारातही याचा उल्लेख असतो, असे अभिनेत्री चाहत खन्नाने म्हटले.

चाहत खन्नाने नुकतंच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. तसेच या मुलाखतीदरम्यान चाहत खन्नाने मी टू आणि कास्टिंग काऊचसारख्या संवेदनशील विषयांवर विचारण्यात आले. त्यावरही तिने स्पष्टपणे मत मांडले.

“दाक्षिणात्य सिनेसृष्टीत उघडपणे बोललं जातं”

“मी जेव्हा माझ्या करिअरची सुरुवात केली. त्यावेळी लोक ‘अम्मा कॉम्प्रोमाइज’ असे बोलायचे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत हे सर्रास चालते. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोक या गोष्टी उघडपणे बोलतात आणि पण ते महिलांचा तितकाच आदरही करतात. हे हिंदी सिनेसृष्टीतही घडते. फक्त इतकाच फरक असतो की दाक्षिणात्य सिनेसृष्टीत याबद्दल उघडपणे विचारले जाते आणि बॉलिवूडमध्ये वेगळ्या पद्धतीने याबद्दल विचारणा होते”, असे चाहत खन्ना म्हणाली.

“मी तर अशा लोकांना भेटले आहे, जे करारात स्पष्टपणे नमूद करतात की तुम्हाला चित्रपटातील अभिनेता, दिग्दर्शक या लोकांसोबत कॉम्प्रोमाइज करावे लागेल. फक्त स्पॉट दादासोडून यात सर्वांचा समावेश असतो.”, असे चाहत खन्नाने म्हटले.

मनोरंजन विश्वात खळबळ

दरम्यान चाहत खन्ना ही ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली. ‘बडे अच्छे लगते है’, ‘शाका लाका बुम बुम’, ‘तुझ संग प्रीत लगाई सजना’, ‘कबुल है’, ‘काजल’  यांसारख्या सुपरहिट चित्रपटात ती झळकली. ती तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. तिने अनेक मालिका आणि चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. मात्र तिला तितकी लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली नाही. तिने दोन विवाह केले, परंतु दोन्ही यशस्वी झाले नाहीत. मात्र आता तिच्या या विधानानंतर मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.