Chandrayaan 3 | चांद्रयान-2 चं लॉन्चिंग ते क्रॅश लँडिंग, सगळा प्रवास ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध
Chandrayaan 3 | चांद्रयान 3 च्या लँडिंग पूर्वी तुम्ही 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता चांद्रयान-2 चा संपूर्ण प्रवास..., 6 सप्टेंबर 2019 रोजी चांद्रयान-2 लॉन्च करण्यात आला जो अपयशी ठरला...

मुंबई | 23 ऑगस्ट 2023 : फक्त भारत देशाचं नाही, तर संपूर्ण जगाचं चांद्रयान 3 कडे लक्ष लागलं आहे. हा भारतासाठी एक ऐतिहासिक क्षण असणार आहे. चांद्रयान 3 यशस्वी लँडिग व्हावं यासाठी समान्य जनतेपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रर्थना करत आहेत. बुधवारी २३ ऑगस्ट रोजी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान – 3 दक्षिण ध्रुवावर यशस्वी रित्या लॅडिंग करणारा भारत पहिला देश ठरणार आहे. म्हणून प्रत्येकाचं लक्ष फक्त आणि फक्त चांद्रयान – 3 वर आहे. याआधी 6 सप्टेंबर 2019 रोजी चांद्रयान-2 लॉन्च करण्यात आला जो अपयशी ठरला होता. त्यामुळे चांद्रयान – 3 कडून प्रत्येक भारतीयाच्या अपेक्षा आहेत.
दरम्यान, चांद्रयान 3 च्या लँडिंग पूर्वी तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर चांद्रयान-2 चा संपूर्ण प्रवास पाहू शकता. काही तांसांनी चांद्रयान – 3 लँडिंग करणार आहे. या ऐतिहासिक क्षणापूर्वी तुम्ही चांद्रयान-2 चा संपूर्ण प्रवास पाहू शकता. या सिनेमात इस्रोच्या बेंगळुरू येथील कमांड सेंटरमधून ‘चांद्रयान २’ मोहिमेची माहिती देण्यात आली.
‘चांद्रयान 2: द लँडिंग’साठी इस्रोने कशी तयारी केली आणि ते कसं प्रक्षेपित झालं पण अयशस्वी झालं… याचा सविस्तर प्रवास सिनेमात दाखवण्यात आला आहे. चांद्रयान 2: द लँडिंग’ OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर उपलब्ध आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू आणि बंगाली या चार भाषांमध्ये तुम्हाला चांद्रयान – 2 चा प्रवास पाहता येणार आहे.
सांगायचं झालं तर, 2019 मध्ये चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करताना चांद्रयान-2 लँडर क्रॅश झालं होतं. प्रचंड मेहनतीनंतर देखील वैज्ञानिकांना अपयश आलं होतं. पण नासाने सलग तीन महिने लँडरचे अवशेष शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्याची ओळख पटू शकली नाही. अखेर NASA ने Lunar Reconnaissance Orbiter ने क्लिक केलेले फोटो प्रसिद्ध केले.
फोटो पाहिल्यानंतर चेन्नईतील एका मेकॅनिकल इंजिनिअरने विक्रमचे अवशेष ओळखले. महत्त्वाची गोष्टी म्हणजे प्रकल्प अपयशी ठरल्यानंतर देखील, इस्रोचे ऑर्बिटर चंद्राभोवती फिरत होतं. चांद्रयान-2 चे ऑर्बिटर 2019 पासून चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे. ज्याचा फायदा चांद्रयान – 3 साठी झाल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या सर्वत्र चांद्रयान – 3 ची चर्चा रंगत आहे.
भारताचं चांद्रयान-3 आज चंद्रावर उतरणार आहे. त्यामुळे भारत आंतराळातील महाशक्ती म्हणून उदयाला येणार आहे. त्यामुळे भारताच्या या महत्त्वकांशी मिशन मूनकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे. भारताचं चांद्रयान-3 अंतिम टप्प्यात असल्यामुळे मिशन पूर्ण व्हावं म्हणून प्रत्येक भारतीय प्रार्थना करत आहे. समान्य जनतेपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाचं लक्ष चांद्रयान-3 कडे आहे.
