AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chaudhry Aslam Khan : संजय दत्तच्या भूमिकेवर खऱ्या चौधरी अस्लमच्या बायकोचं मोठं वक्तव्य

Chaudhry Aslam Khan : 'धुरंधर' आणि 'धुरंधर 2' सिनेमात अभिनेता संजय दत्त याने एसपी चौधरी अस्लम याची भूमिका साकारली आहे... तर संजूबाबाने साकारलेल्या भूमिकेवर खऱ्या चौधरीच्या बायकोनं मोठं वक्तव्य केलं. सध्या सर्वत्र तिच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.

Chaudhry Aslam Khan : संजय दत्तच्या भूमिकेवर खऱ्या चौधरी अस्लमच्या बायकोचं मोठं वक्तव्य
Dhurandhar
| Updated on: Mar 30, 2026 | 11:56 AM
Share

Chaudhry Aslam Khan : अभिनेता रणवीर सिंग स्टारर आणि दिग्दर्शक आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ सिनेमात अभिनेता संजय याने देखील महत्त्वाचा भूमिका साकारली आहे. संजूबाबाने सिनेमात एसपी अस्लम चौधरी याची भूमिका साकारली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्याने साकारलेला सिनेमा प्रचंड आवडलेला आहे… अशात नुकताच झालेल्या एका मुलाखतीत खऱ्या एसपी अस्लम चौधरी याची बायको नोरी हिने अस्लम याच्या खऱ्या आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नोरी हिची चर्चा रंगली आहे. ‘धुरंधर’मधील त्याची भूमिका आणि खऱ्या आयुष्यातील अस्लम यांच्या फार मोठा फरक आहे… असं देखील नोरी म्हणाली.

सांगायचं झालं तर, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, नोरी हिने पहिल्यांदा संजय दत्त याच्याबद्दल वक्तव्य केलं आहे. नोरी म्हणाली, ‘चौधरी अस्लम स्वतः संजय दत्त याचा चाहता होता… आमच्यामध्ये कायम संजय याच्याबद्दल बोलणं व्हायचं… मी सुद्धा त्याची चाहती होते आणि आहे. अनेकांनी मला सांगितसं, एका सीनमध्ये तो नजर वर करून पाहतो, तो सून खूप चांगला आङे… चौधरी अस्लम ही भूमिका त्याला शोभते. मी आणि अस्लम दोघांनी मिळून ‘खलनायक’ सिनेमा पाहिला आहे. सिनेमा दोघांना प्रचंड आवडला. एक खलनायक इकडे आणि एक खलनायक तिकडे…’, असं देखील अस्लम याची बायको म्हणाली.

पुढे नोरी म्हणाली, ‘चौधरी अस्लम याला सिनेमात ज्या प्रकारे दाखवण्यात आलं आहे, खऱ्या आयुष्यात तो तसा नव्हता. चौधरी अस्लम याचं खरं आयुष्य फार खडतर होतं. अस्लमने कधीच बुलेटप्रुफ जॅकेट वापरलं नाही… त्याने फार मोठं जग पाहिलं आहे.. ल्यारीमधील सर्वच लोक चुकीचे आहे असं नाही… मी दहशतवादात सामील असणाऱ्यांसाठी बोलेल… जे चुकीचं आहे ते चुकीचच आहे… सिनेमाच चौधरी अस्लम यांना फार वेगळं दाखवण्यात आलं आहे…’, असं देखील नोरी म्हणाली… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त खऱ्या चौधरी अस्लम याची बायको नोरी हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

धुरंधर 2  सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमा फक्त भारतात नाही तर, जगभरात नवीन विक्रम रचत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 1600 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 2800 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा