AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhaava ने 17 व्या दिवशी रचला इतिहास, ‘बाहुबली’ वर केली मात, ‘या’ 2 सिनेमांना बसलाय मोठा फटका

Chhaava Box Office Collection Day 17: सलग 17 व्या दिवशी 'छावा' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाल, 'बाहुबली' सिनेमावप मात करत 'छावा'ने रचला इतिहास, पण 'या' 2 सिनेमांना मोठा फटका....', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'छावा' सिनेमाची चर्चा...

Chhaava ने 17 व्या दिवशी रचला इतिहास, 'बाहुबली' वर केली मात, 'या' 2 सिनेमांना बसलाय मोठा फटका
| Updated on: Mar 03, 2025 | 10:19 AM
Share

Chhaava Box Office Collection Day 17: अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘छावा’ सिनेमापुढे बॉक्स ऑफिस देखील नतमस्तक झालं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौऱ्यावर आधारित ‘छावा’ सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळत आहे. 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला सिनेमा सलग 17 व्या दिवशी देखील बक्कळ कमाई करताना दिसत आहे. ‘छावा’ सिनेमाचा फक्त भारतात नाही तर, महाराष्ट्रात देखील बोलबाला पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर, ‘छावा’ सिनेमाच्या यशापुढे ‘सुपरबॉयज ऑफ मालेगांव’ आणि ‘क्रेझी’ या दोन सिनेमांना मोठा फटका बसला आहे.

‘छावा’ सिनेमाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 31 कोटी रुपयांचा गल्ला जमा केली. सिनेमा गेल्या 17 दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे. 17 व्या दिवशी म्हणजे रविवारी देखील सिनेमाने मोठी मजल मारली आहे. ‘छावा’ सिनेमाने ‘बाहुबली’ सिनेमाच्या लाईफटाईम कलेक्शनवर देखील मात केली आहे. ‘बाहुबली’ सिनेमाने 421 कोटींची कमाई केली होती.

‘छावा’ सिनेमाने भारतात केलेली कमाई

रिपोर्टनुसार, सिनेमाने 17 व्या दिवशी 25 कोटींची कमाई केली आहे. तर शनिवारी सिनेमाने जवळपास 22 कोटींची कमाई केली आहे. सलग तीन आठवडे सिनेमा चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसत आहे. गेल्या 17 दिवसांमध्ये ‘छावा’ सिनेमाने भारतात जवळपास 459.50 कोटी रुपयांचा गल्ला केला आहे.

जगभरातील ‘छावा’ सिनेमाची कमाई

‘छावा’ सिनेमाच्या जगभरातील सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाने 600 कोटींचा टप्पा पार केला आहे. परदेशात सिनेमाने शनिवारी 75 कोटींची कमाई केली. रविवारपर्यंत सिनेमाने जगभरात 620 कोटींची कमाई केल्याची माहिती समोर येत आहे.

‘सुपरबॉयज ऑफ मालेगाव’ सिनेमाची कमाई

दिग्दर्शिका रीमा कागती दिग्दर्शित ‘सुपरबॉयज ऑफ मालेगाव’ सिनेमाचं विश्लेषकांनी देखील कौतुक केलं आहे. पण बॉक्स ऑफिसवर सिनेमा फेल ठरला आहे. सिनेमाने आतापर्यंत फक्त 1.82 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

‘क्रेझी’ सिनेमाची कमाई

‘क्रेझी’ सिनेमा देखील मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. सिनेमात सोहम शाह, निमिषा सजयन, टीनू आनंद, शिल्पा शुक्ला आणि उन्नति खुराना मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमाने रविवारी 1.50 कोटींची कमाई केली. तर सिनेमाने आतापर्यंत फक्त 3.85 कोटींची कमाई केली आहे.

Follow Us
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा