AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रोटोकॉल बाजूला सारून देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांची शवपेटी उचलली, पुणे विमानतळावर..

नाना पाटेकर यांनी वयाच्या 75 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. नाना पाटेकर आज आपल्यात नाही, यावर कोणालाही विश्वास बसत नाहीये. त्यातच नानांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रोटोकॉलही सोडल्याचे बघायला मिळतंय.

प्रोटोकॉल बाजूला सारून देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांची शवपेटी उचलली, पुणे विमानतळावर..
Devendra Fadnavis and Nana Patekar
| Updated on: Oct 09, 2026 | 8:55 AM
Share

अभिनेते नाना पाटेकर यांनी गोव्याच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. रात्री दोन वाजता त्यांनी डॉक्टरांना मला असवस्थ वाटत असल्याचा मेसेज केला. पण ज्यावेळी प्रत्यक्षात वैद्यकीय पथक नानांच्या घरी पोहोचले, त्यावेळी ते बेशुद्ध अवस्थेत होते. डॉक्टरांनी त्यांचा मेसेज सकाळी 4 वाजता पाहिला. वैद्यकीय पथकाने 45 मिनिट नाना पाटेकर यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. नाना पाटेकर गेल्या काही दिवसांपासून आपल्या गोव्यातील घरीच होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर आणि महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. नाना पाटेकर हे केवळ एक कलाकारच नव्हते, तर त्यांनी नाम फांउडेशनच्या माध्यमातून राज्याच्या दुष्काळी भागात अनेक मोठी समाजोपयोगी काम केली होती. नाना पाटेकर हे एक उत्तम कलाकार होते, त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक चित्रपट अजरामर केले. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. आजही कोणाला विश्वास बसत नाही की, नाना आपल्यात नाहीत.

नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर रात्री उशीरा पुण्यातील डोणजे गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. गोव्यातून पुणे विमानतळावर नानांचे पार्थिव आणले गेले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे विमानतळावर पोहोचले. त्यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी फडणवीस यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले.

फडणवीसांनी पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. प्रोटोकल बाजूला ठेवत फडणवीसांनी थेट शवपेटीला खांदा दिला आणि रूग्णवाहिकेपर्यंत पोहोचवण्यास मदत केली. यावरून कळते की, देवेंद्र फडणवीस आणि नाना पाटेकर यांचे संबंध कशी होती. नानांच्या निधनाची बातमी कळताच देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा मुलगा मल्हार याला फोन करून सात्वंन केले होते.

त्यानंतर विमानतळावर त्यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली. फक्त बॉलिवूड कलाकारच नाही तर राजकीय व्यक्तींनीही मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केले. नाना पाटेकर यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला. नानाची वाडीमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांची शेवटची इच्छाही पूर्ण करण्यात आली.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
Nana Patekar Passes Away | कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...
Pune Vidhan Parishad Election : पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती... प्रफुल पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे?
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ....
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?
'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नानांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
Nana Patekar Passes Away : 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नाना पाटेकर यांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच