AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chota Pudhari: घनश्याम पैशाच्या मागे आहे… छोटा पुढारीने शिवसेना नेत्याला सुनावले, व्हिडीओची चर्चा

Ghanshyam Darode : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये छोटो पुढारी मराठी कलाकारांची बाजू मांडताना दिसत आहे. आता नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या...

Chota Pudhari: घनश्याम पैशाच्या मागे आहे... छोटा पुढारीने शिवसेना नेत्याला सुनावले, व्हिडीओची चर्चा
Ghanshyam DarodeImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 06, 2026 | 1:12 PM
Share

काल संपूर्ण देशात दहीहंडी हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. हजारोंच्या सख्येने लोकं या दहीहंडीच्या उत्सवात सहभागी झाली होते. आता यावर बिग बॉस मराठी फेम छोटा पुढारी उर्फ घनश्याम दरोडेने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने शिवसेना नेत्यावर गंभीर आरोप केला आहे. तसेच मराठी कलाकारांना देखील सावध केले आहे.

काय आहे व्हिडीओ?

छोटा पुढारीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने शिंदेंच्या शिवसेना नेत्याचा उल्लेख करत त्याच्यावर आरोप केले आहेत. व्हिडीओमध्ये छोटा पुढारी म्हणाला की, इतक्या वर्षात ही गोष्ट कधीच कोण न बोलणारा आज मी बोलतोय. मला माहित नाही याचे पडसाद काय उमटणार आहेत, पण कोणीतरी पुढे येऊन बोललं पाहिजे. मला मुंबईला दहीहंडीसाठी बोलावलं होतं. मी गेल्या वर्षीही त्यांची दहीहंडी केली होती. त्यांनी 50% ॲडव्हान्स पाठवल्यानंतर ते मला घ्यायला गाडी पाठवणार होते. आयोजकांनी सर्व व्यवस्थित ठरवलं, गाडी ठरवली आणि बजेट पण ठरवलं. त्यांनी सगळ्यात आधी पहिल्यांदा मला बुकिंग केलं होतं, सगळ्यात आधी ॲडव्हान्स मला पाठवला, नंतर मी त्यांना आणखी काही कलाकारही दिले. नंतर त्यांनी मला फोन करून सांगितलं, ‘दादा, आम्ही गाडी पाठवू शकत नाही किंवा तुम्ही नाही आलात तरी चालेल,” मी म्हटलं ठीक आहे. मग ॲडव्हान्सचं काय करायचं? तर त्यांनी ॲडव्हान्स तुम्हाला राहू द्या असं सांगितलं. जसेजसे त्यांना 5 लाख, 6 लाख, 9 लाख असे बिग बजेटवाले हिंदी कलाकार मिळत गेले, तसं त्यांनी मराठी कलाकारांना डावललं असे म्हणाला.

“कधीतरी कलाकारांचं दुःख समजत जा”

पुढे तो म्हणाला की, काही लोकं म्हणतात कलाकारांना खूप एटीट्यूड असतो, ते खूप मानधन सांगतात, त्यांना आधी पैसे द्यावे लागतात, जसं काही आमच्या मंडळावरती विश्वास नसतो. पण प्रश्न मंडळावरती विश्वासाचा नसतो. आमच्या बाबतीत अशा गोष्टी घडलेल्या असतात, झालेल्या असतात. आम्ही दिलेला शब्द पाळतो. आता जर मी दुसरी दहीहंडीला गेलो असतो आणि तुमच्या दहीहंडीला आलो नसतो, तर तुम्ही ‘घनश्याम दरोडे पैशाच्या मागे आहे, तो दहीहंडीला येत नाही, आमच्या दहीहंडीला येतो म्हणून सांगितलं आणि आला नाही’ किंवा जर आमच्याकडून एक कार्यक्रम डबल घेण्यात आला आणि त्यावेळेला जर नाही गेलो, तर डबल ॲडव्हान्स घेतला जातो, अशी मार्केटमध्ये पब्लिसिटी केली असती की नाही? बरोबर ना? कधीतरी कलाकारांचं दुःख समजत जा. आम्ही काय खूप श्रीमंत नाही. तुमच्या मंडळाची जशी शोची तयारी असते ना, तशी आमची पण काहीतरी तयारी असेल ना?

Follow Us
राज ठाकरेंची ही ॲक्शन पहाच; नेमका कुणावर साधला निशाणा?
Raj Thackeray UNCUT Speech | राज ठाकरेंची ही ॲक्शन पहाच; नेमका कुणावर साधला निशाणा?
मला भीती वाटते की... राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत
मला भीती वाटते की... राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत मोठ्या...
तो कोण कुरळ्या केसांचा बाबा... राज ठाकरेंनी रावणाचा किस्सा सांगताच...
तो कोण कुरळ्या केसांचा बाबा... राज ठाकरेंनी किस्सा सांगिताच हशा पिकला, मेळाव्यातील लोकं...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं पु्न्हा मोठं विधान; थेट म्हणाले...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं पु्न्हा मोठं विधान; थेट म्हणाले, न्यायप्रक्रियेतील गती...
भाजपऐवजी चक्क काँग्रेसचा उल्लेख; भरमंचावर भाजप खासदाराचे वक्तव्य चुकलं
भाजपऐवजी चक्क काँग्रेसचा उल्लेख; भरमंचावर भाजप खासदाराचे वक्तव्य चुकलं, स्वतःच्याच मुलाला...
विद्यानंद बापट यांच्यावरील हल्लाबाबत सुळेंची सर्वात मोठी प्रतिक्रिया;
Supriya Sule | विद्यानंद बापट यांच्यावरील हल्लाबाबत सुळेंची सर्वात मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाल्या...
सरकार पडल्यानंतर सर्वात आधी हा नेताच पक्ष सोडणार; बड्या नेत्याच्या...
सरकार पडल्यानंतर सर्वात आधी हा नेताच पक्ष सोडणार; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
जरांगेंच्या उपोषणाचा आज नववा दिवस; तब्येत आणखी खालावली, मात्र...
Manoj Jarange Patil | जरांगेंच्या उपोषणाचा आज नववा दिवस; तब्येत आणखी खालावली, मात्र...
बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा सत्कार; चांदीचे कडं देऊन...
बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा सत्कार; चांदीचे कडं देऊन... संग्राम भंडारेंनी केली अजब घोषणा
काँग्रेस पक्षाला मोठा धक्का! झारखंड सरकारमधील बड्या मंत्र्याचे निधन,
काँग्रेस पक्षाला मोठा धक्का! झारखंड सरकारमधील बड्या मंत्र्याचे निधन, कारण...