AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raju Patil: निवडणूकीत बोगस मतदारांचा फटका? SIR मध्ये इतक्या लाख मतदारांना वगळले, राजू पाटील यांनी आकडाच सांगितला

Raju Patil on SIR Voter List: मनसे नेते आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे माजी आमदार राजू पाटील यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्या गावातूनही त्यांना मतदान झाले नव्हते. आता SIR प्रक्रियेत एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यावर राजू पाटील यांनी मोठे भाष्य केले आहे.

Raju Patil: निवडणूकीत बोगस मतदारांचा फटका? SIR मध्ये इतक्या लाख मतदारांना वगळले, राजू पाटील यांनी आकडाच सांगितला
राजू पाटील, मनसे नेतेImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Sep 06, 2026 | 1:01 PM
Share

मनसे नेते आणि कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांना गेल्या विधानसभेत यश मिळाले नाही. कटाई हे त्यांचे गाव आहे. या गावात 1400 मते आहेत. पण त्यातील एकही मत राजू पाटील यांना मिळाले नसल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वी केला होता. त्यांना आमदारकीच्या निवडणुकीत पराभवाला तोंड द्यावे लागले. त्यानंतर आता SIR प्रक्रियेत राजू पाटील यांच्या मतदार संघातील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. एसआयआर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात मतदारांना वगळण्यात आले आहे. त्यावर राजू पाटील यांनी मोठे भाष्य केले आहे.

जवळपास 95 टक्के नावं वगळली

SIR प्रक्रियेत मतदार यादीतून किती मतदारांची नावं कमी झाली आहेत, यावर मनसे नेते राजू पाटील यांनी मोठे भाष्य केले आहे. आपल्या मतदार संघातील जवळ जवळ 2 लाख 55 हजार नावं कमी झालेली आहेत. त्यातील 2 लाख 37 हजार नावं ही ट्रेसेबल नाहीत. त्यांचे प्रमाण 94.60 टक्के इतके आहे. आम्ही निवडणूक आयोगाला गठ्ठेच्या गठ्ठे दिली आहेत. ही नावं दुबार आहेत. ही माणसं इथे राहत नाहीत, असं आम्ही त्यावेळी सांगितले. पण निवडणूक आयोगाने त्यावेळी काही ऐकलं नाही असा आरोप राजू पाटील यांनी केला.

नाव नोंदवण्याची संधी

राज्यात दोन कोटींहून अधिक नावं वगळण्यात आली आहेत. या सर्वांसंदर्भात त्यांनी मोठे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे. जर तुमचे नाव मतदार यादीत नसेल तर सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत तुम्हाला अजूनही वेळ आहे. नाव नोंदवता येणार आहे. यानंतर मात्र ही प्रक्रिया अधिक किचकट होणार आहे. यामुळेच आताच लक्षपूर्वक मतदार यादीत तुमचं नाव नोंदवा असे आवाहन राजू पाटील यांनी केले.

बोगस मतदारांचं पितळ उघड पडणार

दोन कोटींहून मतदारांचे नाव वगळल्याप्रकरणात मनसे आंदोलन करणार का? याचेही उत्तर त्यांनी दिले. मागे सुद्धा राज ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधात सर्व पक्षांना एकत्र केले होते. त्यात काही पक्ष आले नाही. आम्ही फुगवलेल्या मतदार यादीविरोधात मोर्चा काढला होता. वोटचोरीविरोधात आम्ही मोर्चा काढला होता. आम्ही या गोष्टी सतत करत असतो. पण लोकांनी या गोष्टीत सहभाग नोंदवला पाहिजे. आता एक संधी आलेली आहे. जी मराठी नावं वगळलेली आहे, त्यांनी मतदार यादीत नाव नोंदवायला हवी. जे इथं राहतच नाही, त्यांच पितळ उघडं पडणार आहे, असे राजू पाटील म्हणाले.

Follow Us
राज ठाकरेंची ही ॲक्शन पहाच; नेमका कुणावर साधला निशाणा?
Raj Thackeray UNCUT Speech | राज ठाकरेंची ही ॲक्शन पहाच; नेमका कुणावर साधला निशाणा?
मला भीती वाटते की... राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत
मला भीती वाटते की... राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत मोठ्या...
तो कोण कुरळ्या केसांचा बाबा... राज ठाकरेंनी रावणाचा किस्सा सांगताच...
तो कोण कुरळ्या केसांचा बाबा... राज ठाकरेंनी किस्सा सांगिताच हशा पिकला, मेळाव्यातील लोकं...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं पु्न्हा मोठं विधान; थेट म्हणाले...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं पु्न्हा मोठं विधान; थेट म्हणाले, न्यायप्रक्रियेतील गती...
भाजपऐवजी चक्क काँग्रेसचा उल्लेख; भरमंचावर भाजप खासदाराचे वक्तव्य चुकलं
भाजपऐवजी चक्क काँग्रेसचा उल्लेख; भरमंचावर भाजप खासदाराचे वक्तव्य चुकलं, स्वतःच्याच मुलाला...
विद्यानंद बापट यांच्यावरील हल्लाबाबत सुळेंची सर्वात मोठी प्रतिक्रिया;
Supriya Sule | विद्यानंद बापट यांच्यावरील हल्लाबाबत सुळेंची सर्वात मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाल्या...
सरकार पडल्यानंतर सर्वात आधी हा नेताच पक्ष सोडणार; बड्या नेत्याच्या...
सरकार पडल्यानंतर सर्वात आधी हा नेताच पक्ष सोडणार; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
जरांगेंच्या उपोषणाचा आज नववा दिवस; तब्येत आणखी खालावली, मात्र...
Manoj Jarange Patil | जरांगेंच्या उपोषणाचा आज नववा दिवस; तब्येत आणखी खालावली, मात्र...
बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा सत्कार; चांदीचे कडं देऊन...
बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा सत्कार; चांदीचे कडं देऊन... संग्राम भंडारेंनी केली अजब घोषणा
काँग्रेस पक्षाला मोठा धक्का! झारखंड सरकारमधील बड्या मंत्र्याचे निधन,
काँग्रेस पक्षाला मोठा धक्का! झारखंड सरकारमधील बड्या मंत्र्याचे निधन, कारण...