AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Love Story : बायकोने अर्ध्यावर सोडली साथ, पण ACP Pradyuman यांनी नाही केला दुसऱ्या लग्नाचा विचार, डोळ्यात पाणी आणणारी लव्हस्टोरी…

Love Story : अभिनेते शिवाजी साटम यांच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल सर्वांना माहिती आहे, पण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कोणाला माहिती नाही. शिवाजी साटम यांच्या लव्हस्टोरी बद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

Love Story : बायकोने अर्ध्यावर सोडली साथ, पण ACP Pradyuman यांनी नाही केला दुसऱ्या लग्नाचा विचार, डोळ्यात पाणी आणणारी लव्हस्टोरी...
| Updated on: Jun 09, 2026 | 2:37 PM
Share

Love Story : अभिनेते शिवाजी साटम यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, पण ‘CID’ या शूमधून त्यांच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत मोठी वाढ झाली. शिवाजी यांच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल अनेकांना माहिती आहे. पण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कोणाला माहिती नाही. शिवाजी साटम यांचं लग्न अरुणा साटम यांच्यासोबत झालं होतं. पण बायकोची साथ त्यांना फार काळ लाभली नाही. पत्नीच्या निधनानंतर शिवाजी यांनी देखील दुसऱ्या लग्नाचा कधीच विचार केला नाही. शिवाजी साटम आणि अरुणा साटम यांचं अरेंज मॅरेज होतं, पण दोघांना पाहिल्यानंतर असं वाटत नव्हतं की, त्यांचे अरेंज मॅरेज आहे. शिवाजी साटम यांच्या वडिलांच्या इच्छेने शिवाजी साटम आणि अरुणा साटम यांचं लग्न झालं. शिवाजी साटम आणि अरुणा साटम फक्त 24 वर्ष सुखी संसार करू शकले.

खुद्द शिवाजी साटम यांनी पत्नीच्या निधनानंतर आलेल्या परिस्थितीबद्दल सांगितलं आहे. अरुणा साटम यांचं कर्करोगाने निधन झालं. त्यांच्यावर तब्बल सात वर्ष उपचार सुरु होते. शिवाजी साटम म्हणाले, ‘कठीण परिस्थिती आल्यानंतर आपल्यामध्ये नकळत हिंमत कशी येते, ते कळत नाही. ती वेळ अत्यंत कठीण होती. मुलं मोठी होत होती.. त्यांच्यावर उत्तम संस्कार देखील करायचे होते.’

‘मी ‘गुलाम-ए-मुस्तफा’ सिनेमाचं शुटिंग करत होतो, तेव्हा माझ्या पत्नीचं निधन झालं. या कठीण परिस्थितीत अभिनेते नाना पाटेकर, अरूणा इराणी यांनी शिवाजी साटम यांची साथ दिली. अभिनेते म्हणाले, ‘ते माझं कुटुंब नव्हते, पण कुटुंबापेक्षा कमी देखील नव्हते… तब्बल तीन महिने त्यांनी मला सांभाळून घेतलं…’ असं देखील शिवाजी साटम म्हणाले.

शिवाजी साटम यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी ‘नायक’, ‘वास्तव’, ‘गुलाम-ए-मुस्तफा’, ‘चायना गेट’, ‘यशवंत’, ‘जिस देश में गंगा रेहता हैं’ ‘सूर्यवंशम’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. 1998 साली शिवाजी साटम यांनी ‘सीआयडी’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. एवढंच नाही तर, शिवाजी साटम यांनी अनेक सिनेमांची निर्मिती आणि दिग्दर्शन देखील केलं आहे. आज देखील शिवाजी साटम झगमगत्या विश्वात सक्रिय आहेत.

Follow Us
गटार पूजन करत ठाकरे सेनेचा संताप; ठाणे पालिकेविरोधात अनोखं आंदोलन!
Shivsena ubt | गटार पूजन करत ठाकरे सेनेचा संताप; ठाणे पालिकेविरोधात अनोखं आंदोलन!
लाखोंच्या घोडेबाजारीच्या चर्चा होत असतानाच भाजप नगरसेवकांचं मोठं पाऊल,
लाखोंच्या घोडेबाजारीच्या चर्चा होत असतानाच भाजप नगरसेवकांचं मोठं पाऊल, प्रत्येक 13 हजार... नेमकं काय घडलं?
मनसेचे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन! हातात भांडे घेऊन सरकारविरोधात एल्गार
Nagpur MNS Protest | मनसेचे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन! हातात भांडे घेऊन सरकारविरोधात एल्गार, नेमकं काय घडलं?
शिवसेनेत मोठा भूकंप! अब्दुल सत्तारांना पुन्हा झटका, 14 जणांचा अर्ज...
शिवसेनेत मोठा भूकंप! अब्दुल सत्तारांना पुन्हा झटका, 14 जणांच्या अर्जावर... थेट कोर्टापर्यंत गेलं प्रकरण
राज्यात मान्सूनची दमदार एंट्री!; या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
Mansoon Update | राज्यात मान्सूनची दमदार एंट्री!; या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
महायुतीत मोठी खलबत! इकडे महाजन म्हणतात आज गुडन्युज, तर तिकडे गिते...
महायुतीत मोठी खलबत! इकडे महाजन म्हणतात आज गुडन्युज, तर तिकडे गिते...
नाशिकच्या राजकारणात खलबतं! गितेंच्या पाठिंब्यासाठी दराडेंची गुप्त भेट
Narendra Darade | नाशिकच्या राजकारणात मोठी खलबतं! गोकुळ गितेंच्या पाठिंब्यासाठी दराडेंची गुप्त भेट
मोठी बातमी! दुचाकीवरून आले अन् थेट गोळ्या... एकनाथ शिंदेंच्या नेत्यावर
मोठी बातमी! दुचाकीवरून आले अन् थेट गोळ्या... एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यावर जीवेघणा हल्ला, धक्कादायक व्हिडीओ समोर
विखे पाटलांच्या बंगल्याबाहेर मराठा आंदोलकांचा थेट ठिय्या!
Maratha Reservation | सरकारच्या आश्वासनांचा भंग? विखे पाटलांच्या बंगल्याबाहेर मराठा आंदोलकांचा थेट ठिय्या!
मुख्यमंत्र्यांच्या सुचनेवरून मी... राष्ट्रवादीकडील राज्यसभेच्या जागेवर
मुख्यमंत्र्यांच्या सुचनेवरून मी... राष्ट्रवादीकडील राज्यसभेच्या जागेवरून नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाल्या?