Govardhan Asrani Died : असरानी यांनी बायकोसाठी किती संपत्ती मागे ठेवली, कोण आहे कुटुंबात?

Govardhan Asrani Died : हिंदी सिनेसृष्टीत एक कसलेला आणि बहुआयामी अभिनेता म्हणून असरानी यांचा नावलौकिक होता. पण अचानक त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या कुटुंबावर तर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Govardhan Asrani Died : असरानी यांनी बायकोसाठी किती संपत्ती मागे ठेवली, कोण आहे कुटुंबात?
फाईल फोटो
| Updated on: Oct 21, 2025 | 8:13 AM

Govardhan Asrani Died : दिवाळीच्या मुहूर्तावर सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली. असरानी यांचं निधन झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोवर्धन असरानी यांचे आज सायकाळी चार वाजता निधन झाले. दीर्घकाळापासून ते एका आजारावर उपचार घेत होते. त्यांना रुग्णालयात दाखल देखील करण्यात आलं होतं. पण उपचारा दरम्यान त्यांचं निधन झालं. वयाच्या 84 व्या वर्षी असरानी यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पत्नीसाठी असरानी यांनी किती संपत्ती मागे ठेवली?

शोले, चुपके-चुपके, अभिमान यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारणाऱ्या असरानी यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीमध्ये मोठी पोकळी निर्माण झआली आहे. रिपोर्टनुसार, असरानी यांनी मृत्यूनंतर पत्नीसाठी तब्बल 40 – 50 कोटी रुपये मागे ठेवले आहेत. त्यांनी आपली बहुतेक संपत्ती चित्रपटांमध्ये अभिनय, चित्रपट दिग्दर्शन, ब्रँड एंडोर्समेंट आणि वेब सिरीजमधून कमावली.

अभिनेत्री होती असरानी यांची पत्नी…

असरानी यांच्या पत्नीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. असरानी यांची पत्नी मंजू बन्सल यांनी अभिनय क्षेत्रात काम केलं आहे. काम करत असताना मंजू आणि असरानी यांच्यात प्रेम बहरलं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

असरानी यांचं संपूर्ण कुटुंब…

असरानी यांचा जन्म जयपूर येथे एका सिंधी हिंदू कुटुंबात झाला. त्यांना चार बहिणी आणि तीन भाऊ आहेत. असरानी यांचा मुलगा नवीन असरानी याने चित्रपटात करिअर केलं नाही तर वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय आहे. त्यांचा मुलगा डेंटिस्ट आहे.

कोणत्या सिनेमातून असरानी यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं…

असरानी यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीतून केली. 1964 मध्ये, असरानी यांनी पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला आणि 1966 मध्ये त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर, 1967 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हरे कांच की चुडियां’ या सिनेमातून त्यांना हिंदी चित्रपटांमध्ये पहिला ब्रेक मिळाला, ज्यामध्ये त्यांनी अभिनेता विश्वजीतच्या मित्राची भूमिका साकारली होती.

असरानी यांचा शेवटचा सिनेमा…

असरानी 2023 पर्यंत बॉलिवूडमध्ये सक्रिय होते. ते शेवटचे 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नॉन स्टॉप धमाल’ सिनेमात दिसले होते. याआधी ते ड्रीम गर्ल 2, बंटी और बबली 2 आणि इट्स माय लाईफ सारख्या सिनेमांध्येही दिसले होते.