AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समय रैना पुन्हा वादात? प्रसिद्ध कॉमेडियन प्रचंड भडकला, थेट व्हिडीओ पोस्ट करून…

समय रैनाच्या  ‘इंडियाज गॉट लेटेंट’सारख्या कार्यक्रमांमध्ये आक्षेपार्ह भाषा आणि शिवीगाळ झाल्याचा उल्लेख करत, अशा पार्श्वभूमीच्या कलाकाराला सरकारी सन्मान का दिला जात आहे, असा सवाल त्यांनी केला.

समय रैना पुन्हा वादात? प्रसिद्ध कॉमेडियन प्रचंड भडकला, थेट व्हिडीओ पोस्ट करून...
samay raina and sunil palImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 27, 2026 | 9:59 PM
Share

Samay Raina And Sunil Pal : कॉमेडियन समय रैना हा नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. त्याचे विनोद हे पातळी सोडून असतात असा आरोप केला जातो. शिवीगाळ करणारा हा कॉमेडियन आहे, असं अनेकजण म्हणतात. परंतु सोशल मीडियावर त्याचे लाखोंनी चाहते आहेत. सध्या तो महाराष्ट्र सरकारच्या एका कार्यक्रमात उपस्थित असल्याचे दिसले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी समय रैनाला पुष्पगुच्छ देऊन त्याचा सन्मानही केला. या कार्यक्रमातही समय रैना काही विनोद करताना दिसला. त्याचे या कार्यक्रमातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, समय रैनाला महाराष्ट्र सरकारने दिलेला हा सन्मान पाहून कॉमेडियन सुनील पाल चांगलेच भडकले आहेत. त्यांनी सरकाराच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केलीय.

सुनील पाल यांनी व्यक्त केली नाराजी

सुनील पाल यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. समय रैनाच्या  ‘इंडियाज गॉट लेटेंट’सारख्या कार्यक्रमांमध्ये आक्षेपार्ह भाषा आणि शिवीगाळ झाल्याचा उल्लेख करत, अशा पार्श्वभूमीच्या कलाकाराला सरकारी सन्मान का दिला जात आहे, असा सवाल त्यांनी केला. या सन्मानाचा नव्या पिढीतील कलाकारांवर चुकीचा संदेश जाऊ शकतो, अशी भीतीही सुनील पाल यांनी व्यक्त केली. प्रसिद्धी मिळवण्यासाठी वाद निर्माण करणे, आक्षेपार्ह भाषा वापरणे आणि कायदेशीर अडचणी निर्माण करून चर्चेत येणे, यानंतर सन्मान मिळतो असा संदेश जाऊ नये, असे त्यांनी म्हटले. याच मुद्द्यावर बोलताना त्यांनी वारंवार ‘घोर कलयुग’ असा उल्लेख केला.

याआधी सायबर सेलची टीम…

सन्मान स्वीकारताना समय रैनानेही आपल्या खास विनोदी शैलीत भाष्य केले. महाराष्ट्र सायबर सेलसोबत आपले जुने नाते आहे. मी तर 1930 हा क्रमांक आपल्या फोनमध्ये सेव्ह केला आहे, असं रैना मिश्कीलपणे म्हणाला. सायबर सेलच्या सक्रियतेवरही त्याने विनोद केला. याआधी कॉमेडियनच्या घरी चौकशीसाठी पोहोचणारी सायबर सेलची टीम यावेळी मात्र सन्मान करण्यासाठी आली, असं समय रैना हसत-हसत म्हणाला. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकवला.

Follow Us
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश
मोठी बातमी! अडीच वर्षांनंतर शिंदे गटाला मिळणार मुंबईचे महापौरपद?
मोठी बातमी! पहिल्या अडीच वर्षांनंतर शिंदे गटाला मिळणार मुंबईचे महापौरपद? थेट... नेमकं सत्य काय?
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे पंतप्रधानांना पत्र; डिलिमिटेशन
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे पंतप्रधानांना पत्र; डिलिमिटेशनबाबत मोठी अपडेट समोर
नेपाळच्या पूरस्थितीत अडकलेल्या भारतीयांसाठी शिवसेनेचे मदत पथक रवाना
नेपाळच्या पूरस्थितीत अडकलेल्या भारतीयांसाठी शिवसेनेचे मदत पथक रवाना
मराठी शिकण्यास रिक्षाचालकांना मुदतवाढ, सरनाईकांचा निर्णय...
Devendra Fadnavis : मराठी शिकण्यास रिक्षाचालकांना मुदतवाढ, सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला
पुन्हा हुंडाबळी; पिंपरी-चिंचवडमध्ये उच्चभ्रू कुटुंबातील विवाहितेचा...
पुन्हा हुंडाबळी; पिंपरी चिंचवडमध्ये उच्चभ्रु कुटुंबातील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप
फडणवीस यांची रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीसाठी एक वर्षाची मुदत वाढ
देवेंद्र फडणवीस यांची रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीसाठी एक वर्षाची मुदतवाढ जाहीर
कोणत्याही गैरप्रकाराशी माझा संबंध नाही', अभिमन्यु पवार यांच्याकडून...
MPSC Paper Leak :कोणत्याही गैरप्रकाराशी माझा संबंध नाही', अभिमन्यु पवार यांच्याकडून भूमिका स्पष्ट