अमेरिका: प्रसिद्ध कंट्री सिंगर जेक फ्लिंट याने त्याची पार्टनर ब्रेंडाशी लग्न करण्यासाठी अनेक स्वप्नं पाहिली होती. हे स्वप्न त्याने सत्यातही उतरवलं होतं. मात्र आनंदाच्या या काही क्षणांनंतर सर्वकाही उद्ध्वस्त झालं. लग्नानंतर काही तासांतच जेकनं अखेरचा श्वास घेतला. त्याच्या या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 37 वर्षीय जेकच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ज्यावेळी आम्ही एकत्र लग्नाचे फोटो पाहायला पाहिजे होतं, त्यावेळी मी पतीच्या अंत्यविधीसाठी कपडे घेतेय, अशी हृदयद्रावक पोस्ट जेकच्या पत्नीने सोशल मीडियावर लिहिली आहे.