AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री थलपती विजय यांचे विवाहबाह्य संबंध? कोर्टातील सुनावणीचे मोठे अपडेट, पत्नीने घटस्फोट..

तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय त्यांच्या वैयक्तीक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. थलपती विजय यांच्या पत्नीने गंभीर आरोप करत कोर्टात याचिका दाखल केली. काल यावर सुनावणी होती. मात्र, कोर्टाने मोठा निर्णय घेतला.

मुख्यमंत्री थलपती विजय यांचे विवाहबाह्य संबंध? कोर्टातील सुनावणीचे मोठे अपडेट, पत्नीने घटस्फोट..
Thalapathy Vijay and sangita
| Updated on: Jun 16, 2026 | 1:51 PM
Share

तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांचे वैयक्तीक आयुष्य चर्चेत आहे. थलपती विजय यांचे विवाहबाह्य संबंधांवर पत्नी संगीता हिने कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. कोर्ट नक्की काय निर्णय देतो, याकडे सर्वांच्या नजरा होत्या. मात्र, कोर्टाने ही सुनावणी तहकूब केली. थलपती विजय यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षाची स्थापना केली. विशेष म्हणजे थलपती विजय यांच्या पक्षाने चांगलाच धुमाकून तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत घातला. थेट एकहाती सत्ता मिळवली. थलपती विजय आणि त्रिशा कृष्णन यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा रंगताना दिसतात. त्रिशा कृष्णन ही थलपती विजय याच्या शपथविधीकरिताही उपस्थित राहिली होती. थलपती विजय आणि संगीता यांच्या प्रकरणात चेंगलपट्टू महिला कोर्टात सुनावणी झाली. मात्र, दोघेही या सुनावणीकरिता गैरहजर होते. दोघेही जण गैरहजर असल्याने कोर्टाने थेट सुनावणी पुढे ढकलली.

आता पुढील सुनावणी 7 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे. कोर्टाने या सुनावणीकरिता संगीता आणि थलपती विजय यांना हजर होण्याचे आदेश दिले होते. मात्र, कोर्टाच्या आदेशानंतरही दोघेही या सुनावणीकरिता हजर राहिले नाहीत. दोघेही हजर नसल्याने सुनावणी तहकूब करण्यात आली. या प्रकरणात पहिली सुनावणी 20 एप्रिल रोजी होती. त्यावेळीही थलपती विजय आणि संगिता दोघेही अनुपस्थित होते. दोघांचेही वकील कोर्टात हजर होते. दोघांच्याही वकिलांनी सुरक्षा आणि अन्य कारण देत ऑनलाईन पद्धतीने कोर्टात हजर राहण्याची मुभा मागितली होती.

मात्र, कोर्टाने त्यांची ही विनंती फेटाळली. मात्र, 15 जूनला कोर्टाने आदेश देऊनही थलपती विजय आणि संगिता हे दोघेही कोर्टात हजर झाले नाहीत. फेब्रुवारी 2026 मध्ये संगीता यांनी कोर्टात घटस्फोटाकरिता याचिका दाखल केली. याच याचिकेत त्यांनी थलपती विजय यांच्यावर विवाहबाह्य संबंध असल्याचा थेट आरोप केला. हेच नाही तर थलपती विजय याचे एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप संगीता यांनी केला. आपल्याला प्रचंड मानसिक वेदना झाल्याचेही त्यांनी त्यात नमूद केले होते. विश्वासघात आपला झाला.

हेच नाही तर थलपती विजय यांनी आपल्याला हे संबंध संपवण्याचे आश्वासन दिले असल्याचेही याचिकेत संगिता यांनी सांगितले. मात्र, त्यानंतर हे विवाहबाह्य संबंध कायम होते. संगीता यांनी जरी अभिनेत्रीचे नाव घेतले नसले तरीही थलपती विजय यांचे त्रिशा कृष्णन हिच्यासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे सांगितले जाते. संगिता आणि थलपती विजय यांचे 27 वर्षाचे नाते तुटत आहे. थलपती विजय आणि संगिता यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा