AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘निर्लज्जपणे तिच्यासोबत तू दररोज..’; दलजीतकडून दुसऱ्या पतीवर विवाहबाह्य संबंधाचे आरोप

निखिल हा केन्यातील फायनान्स सेक्टरमध्ये काम करत असून दलजीत सुटट्यांमध्ये तिथे फिरायला गेली असताना दोघांची भेट झाली होती. या भेटीनंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. लग्नाला वर्ष पूर्ण होण्याआधीच दलजीतने निखिलसोबतचे सर्व फोटो डिलिट केले.

'निर्लज्जपणे तिच्यासोबत तू दररोज..'; दलजीतकडून दुसऱ्या पतीवर विवाहबाह्य संबंधाचे आरोप
Dalljiet Kaur and Nikhil PatelImage Credit source: Instagram
| Updated on: May 26, 2024 | 9:08 AM
Share

‘इस प्यार को क्या नाम दूँ’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दलजीत कौरने मार्च 2023 मध्ये निखिल पटेलशी दुसरं लग्न केलं. या लग्नानंतर ती निखिल आणि मुलासोबत केन्याला राहायला गेली. मात्र वर्षभरातच ती पतीला सोडून मुलासोबत भारतात परतल्यानंतर दलजीतच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं. दलजीतने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पतीसोबतचे सर्व फोटो आणि व्हिडीओसुद्धा डिलीट केले होते. त्यावर आतापर्यंत तिने मौन बाळगलं होतं. अखेर सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये दलजीतने पती निखिलवर विवाहबाह्य संबंधाचा गंभीर आरोप केला आहे. शनिवारी दलजीतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये निखिलचा जिममधील फोटो शेअर केला. त्यावरील ‘SN’ या अक्षरांवर तिने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं.

‘तू आता दररोज निर्लज्जपणे तिच्यासोबत सोशल मीडियावर पोस्ट करतोय. लग्नाच्या दहा महिन्यांतच तुझी पत्नी आणि मुलगा भारतात परतले. संपूर्ण कुटुंबीयांचा अपमान झाला. किमान मुलांखातर तरी थोडा आदर बाळगायला पाहिजे होता. किमान सार्वजनिकरित्या तुझ्या पत्नीसाठी तरी थोडा सन्मान बाकी ठेवायला पाहिजे होता. कारण मी इतर बऱ्याच गोष्टींबद्दल मौन बाळगून होते’, असं तिने निखिलच्या फोटोवर लिहिलं आहे. निखिलचा फोटो पोस्ट करत थेट त्याच्यावर निशाणा साधण्यासाठी दलजीतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आणखी एक पोस्ट लिहिली होती. ब्रायडल फोटोशूटमधील स्वत:चा फोटो पोस्ट करत तिने नेटकऱ्यांना प्रश्न विचारला होता. ‘विवाहबाह्य संबंधाविषयी तुमचे काय विचार आहेत? कोणाला दोष दिला पाहिजे? मुलगी, पती की पत्नी?’, असं तिने लिहिलं होतं.

दलजीतची पोस्ट-

शुक्रवारी दलजीतने तिच्या ब्रायडल फोटोशूटचा रिल पोस्ट केला होता. या रिलच्या कॅप्शनमध्येही तिनेही भावना व्यक्त केल्या होत्या. ‘मुलांखातर ती गप्प राहण्याचं ठरवते. ती खचून जाऊ नये म्हणून तिचं कुटुंब तिच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहतं. ती वाट पाहते.. हाय SN तुला पण मुलं आहेत का?’, असं तिने लिहिलं होतं. दलजीतने 10 मार्च 2023 रोजी बिझनेसमन निखिल पटेलशी दुसरं लग्न केलं. हे दोघांचंही दुसरं लग्न होतं. याआधी दलजीतने अभिनेता शालीन भनोतशी पहिलं लग्न केलं होतं. शालीन आणि दलजीत यांना एक मुलगा आहे. तर निखिललाही पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. दलजीतने शालीन भनोतवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत घटस्फोट दिला होता. 2015 मध्ये हे दोघं विभक्त झाले.

Follow Us
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? फडणवीस सरकारच्या मोठ्या हालचाली सुरू; आजच्या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! वारकऱ्यांचा संताप अनावर
Indrayani River | पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! फेसाळलेल्या नदीने वारकऱ्यांचा संताप अनावर
कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे...
Kolhapur Rain Update | कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे पाण्याखाली, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरूच...
पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब
Mumai Rain Update | पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?