ही मुलगी अमिताभ बच्चन यांना समजली पापड विकणारा; म्हणाली ‘या व्यक्तीचे पापड खूप छान…”, व्हिडीओ व्हायरल
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक ब्रँडच्या पापडाबद्दल विचारताना दिसत आहे. पण ती चुकून त्या ब्रँडची जाहिरात करणाऱ्या सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना पापड विकणारा समजली.

कधी कधी सोशल मीडियावर फार गंमतीशील प्रसंग घडतात. त्याचे व्हिडीओ देखील खूप व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डेन्मार्कमधील कोपेनहेगन येथे राहणारी फ्रेडरिक नावाची मुलगी भारतीय पापडाची मोठी चाहती बनली आहे. अलिकडेच तिने सोशल मीडियावर तिची आवड शेअर केली, ज्यामुळे इंटरनेटवर फक्त तिचीच चर्चा आहे.
सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना पापड बनवणारे समजली
खरंतर, त्या परदेशी मुलीने केवळ एका लोकप्रिय पापड ब्रँडची प्रशंसा केली नाही तर चुकून त्या ब्रँडची जाहिरात करणारे बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना पापड बनवणारे म्हणून समजलं. या गैरसमजामुळे इंटरनेटवर मजेदार कमेंट्सचा पूर आला आहे.
“या माणसाचे पापड खरोखरच चांगले आहेत…”
फ्रेडरिकने त्याच्या इंस्टाग्राम हँडल @bhukkad_bidesi वरून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे . ज्यामध्ये त्या मुलीने लोकप्रिय पापड ब्रँडचे पॅकेट दाखवले आहे. व्हिडिओमध्ये, मुलगी पॅकेटवरील अमिताभ बच्चनच्या चित्राकडे बोट दाखवत म्हणते, ” या माणसाचे पापड खरोखरच चांगले आहेत. या ब्रँडचे पापड मला कुठे मिळतील हे कोणाला माहिती आहे का? जर कोणाला माहिती असेल तर कृपया मला कळवा कारण माझ्याकडे असलेले पापड संपत आहेत.”
“हे पापड कुठे मिळतील…”
मुलीने पुढे म्हटले की तिने हे पापड नेपाळमधून विकत घेतले होते, पण ते कोपनहेगनमध्ये कुठेही उपलब्ध नाहीत. ती म्हणाली,’ माझ्याकडे असलेले पापड आता संपत चालले आहे, जर कोणाला हे पापड कुठे मिळतील किंवा ते कोण बनवते हे माहित असेल तर कृपया मला सांगा.” फ्रेडरिकची पोस्ट काही क्षणातच व्हायरल झाली आणि कमेंट सेक्शन मजेदार कमेंट्सनी भरले गेले. अमिताभ बच्चन यांनी प्रमोट केलेल्या विविध ब्रँडचा उल्लेख करून भारतीय नेटिझन्स मजा घेताना दिसत आहेत.
View this post on Instagram
युजर्सने केलेल्या मजेशीर कमेंट्स
एका वापरकर्त्याने विनोदाने म्हटले की, “हा तोच व्यक्ती आहे जो आपल्याला ऑनलाइन घोटाळ्यांपासूनही वाचवतोय”, दुसऱ्याने कमेंट केली की,”हा तोच व्यक्ती आहे जो नवी दिल्लीतील इंडिया गेटवर बासमती तांदूळ पिकवतो” तर, अजून एका वापरकर्त्याने म्हटले की, “त्याने माझा जीव वाचवण्यासाठी मला पोलिओचे दोन थेंबही दिले आहेत”. तर, त्याच वेळी, बरेच वापरकर्ते अमिताभ बच्चन यांना टॅग करत आहेत आणि लिहित आहेत की, “सर आता फक्त तुम्हीच या मुलीला मदत करू शकता.” सध्या हा व्हिडिओ इंटरनेटवर खूप चर्चेत आहे.
