Deepika Padukone : दीपिका पदुकोण कोरोना पॉझिटिव्ह, वडील प्रकाश पदुकोण यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु

सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:44 PM, 4 May 2021
Deepika Padukone : दीपिका पदुकोण कोरोना पॉझिटिव्ह, वडील प्रकाश पदुकोण यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु
अभिनेत्री दीपिका पदुकोण

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बॉलिवूडचे अनेक सितारे कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आता सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यानंतर आता दीपिकाचीही कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दीपिकालाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. (Bollywood actress Deepika Padukone’s corona test positive)

दीपिकाचे वडील मागील आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह आली होती. त्यांची तब्येत बिघडल्यानंतर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर आता स्वत: दीपिकालाही कोरोनाची लागण झाली आहे.

दीपिकाचं पूर्ण कुटुंब कोरोनाच्या विळख्यात

गेल्या महिन्यात रणवीर सिंह आणि दीपिका मुंबईच्या एअरपोर्टवर दिसून आले होते. ते आपल्या परिवारासोबत काही दिवस घालवण्यासाठी बंगळुरुला गेले होते. दीपिकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येण्यापूर्वी तिच्या वडिलांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली होती. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना बंगळुरुमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे दीपिकाच्या आई उज्ज्वला पदुकोण आणि बहीण अनिषा ही कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यानंतर आता दीपिकाही कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे तिचं पूर्ण कुटुंबच कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 10 दिवसांपूर्वी दिपीकाचे वडील प्रकाश पदुकोण, आई उज्ज्वला आणि बहीण अनिषाला कोरोनाची लक्षणं दिसून आली होती. त्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी करुन घेतली असता त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

दुसऱ्या लाटेत अनेक कलाकार कोरोना पॉझिटिव्ह

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बॉलिवूडचे अनेक कलाकार कोरोना संक्रमित झाले. अनेक दिग्गज कलाकारांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे. तर अनेक कलाकारांनी कोरोनावर यशस्वी मात केलीय. त्यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, कॅटरिना कैफ, रणबीर कपूर, आलिया भट, विकी कौशल, भूमी पेडणेकर, सोनू सूद, अभिजीत सावंत, शुभांगी अत्रे यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या :

कोरोना काळात सिने कर्मचाऱ्यांना ‘यशराज फिल्म्स’चा मदतीचा हात, 30 हजार लोकांसाठी मोफत लसीकरणाची व्यवस्था!

कतरिनाच्या हातून निसटल्या आणि दीपिकाच्या पदरी पडल्या, ‘या’ सुपरहिट फिल्म्सनी चमकले नशिबाचे तारे!

Bollywood actress Deepika Padukone’s corona test positive