कोरोना काळात सिने कर्मचाऱ्यांना ‘यशराज फिल्म्स’चा मदतीचा हात, 30 हजार लोकांसाठी मोफत लसीकरणाची व्यवस्था!

भारतातील कोरोना व्हायरसचे (Corona Virus) वाढते प्रकरण पाहता बर्‍याच चित्रपटांचे आणि टीव्ही मालिकांचे शूटिंग बंद झाले आहे. महाराष्ट्र सरकारनेही राज्यभरात लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केला आहे.

कोरोना काळात सिने कर्मचाऱ्यांना ‘यशराज फिल्म्स’चा मदतीचा हात, 30 हजार लोकांसाठी मोफत लसीकरणाची व्यवस्था!
यश राज फिल्म्स
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 1:24 PM

मुंबई : भारतातील कोरोना व्हायरसचे (Corona Virus) वाढते प्रकरण पाहता बर्‍याच चित्रपटांचे आणि टीव्ही मालिकांचे शूटिंग बंद झाले आहे. महाराष्ट्र सरकारनेही राज्यभरात लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व चित्रीकरणवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, लसीकरणाचा नवीन टप्पा सुरू झाला आहे. याकाळात यशराज फिल्म्सने (Yash Raj films) चित्रपटसृष्टीतील सदस्यांना मोफत लसीकरण देण्याचा निर्णय घेतला आहे. एफडब्ल्यूईसीच्या पत्रानुसार यशराज फिल्म्सने ‘एम अँड ई’ उद्योगातील 30 हजार सदस्यांना मोफत लसी देण्याचा निर्णय घेतला आहे (Yash Raj films wrote letter to CM Uddhav Thackeray to vaccinate 30 thousand film employees).

या पत्रात यशराज फिल्म्सने म्हटले आहे की, चित्रपटसृष्टीतील अनेक लोक साथीच्या आजाराने खूप अस्वस्थ होत आहेत, म्हणून लसीकरणाचे हे काम लवकर सुरु केले पाहिजे जेणेकरुन हजारो कामगार लवकरात लवकर पुन्हा काम सुरू करू शकतील. पत्रात प्रोडक्शन हाऊसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लस विकत घेण्यासाठी परवानगी देण्याची विनंती केली असून, यश राज फाउंडेशन ही रक्कम देईल, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

पाहा ट्विट :

 (Yash Raj films wrote letter to CM Uddhav Thackeray to vaccinate 30 thousand film employees)

FWICEनेही लिहिले पत्र

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने सीएम उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, यशराज फिल्म्सची ही विनंती मान्य करण्यास सांगितले आहे. तसेच सदस्यांना लवकरात लवकर लसी देण्याचेही विनंतीही केली आहे. त्यांनी पत्रात लिहिले आहे की, ‘लसीकरण केवळ या रोगाशी लढायलाच नव्हे, तर राज्यातील ढासळणारी अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत करेल. त्यांनी पत्रात मुख्यमंत्र्यांकडे 30 हजार कलाकार, तंत्रज्ञ आणि कामगार यांच्या लसीकरणाला मान्यता देण्याची मागणी केली आहे.’

ज्येष्ठ अभिनेते म्हणतायत, आम्हाला कामावर परतू द्या..

सोनी सब टीव्हीची मालिका ‘वागले की दुनिया’मधून (Wagle ki Duniya) 30 वर्षानंतर छोट्या पडद्यावर परतलेले ‘श्रीनिवास वागळे’ अर्थात अभिनेते अंजानन श्रीवास्तव (Anjan Srivastava) पुन्हा एकदा मालिकेच्या सेटवर परतण्यासाठी खूप उत्सुक आहेत. परंतु, या कोरोना महामारीत, त्यांचे वय त्यांच्या काम करण्याच्या इच्छे आड येते आहे. मालिकेचे निर्माते जेडी मजीठिया यांनी अंजान श्रीवास्तव आणि भारती आचरेकर यांना घरीच राहण्यास सांगितले आहे. कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक धोकादायक असल्याने, निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे.

(Yash Raj films wrote letter to CM Uddhav Thackeray to vaccinate 30 thousand film employees)

हेही वाचा :

कंगना रनौतचे ट्विटर हँडल सस्पेंड, बंगाल हिंसाचारावरील ट्वीट्सनंतर कारवाई

Video | ‘एक्स अँड नेक्स्ट’ जेव्हा दीपिका-आलिया एकत्र गातात रणबीरचं ‘चन्ना मेरेया’ गाणं, पाहा व्हिडीओ

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.