मुलांसारखे केस असलेल्या या लहान मुलीला ओळखलं का? आज इंडस्ट्रीतील टॉप अन् महागडी अभिनेत्री
बॉलिवूडमधील एका टॉप अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून ती कोण आहे याचा अंदाज लावणे कठीण आहे. हा फोटो पाहून तुम्ही त्या अभिनेत्रीचे नाव सांगू शकाल का?

आपल्या आवडिच्या बॉलिवूड सेलिब्रिटींची एक झलक पाहायला चाहते नेहमीच आतूर असतात. तसेच त्यांच्याबद्दलचे अपडेट जाणून घ्यायलाही नक्कीच चाहत्यांना आतुरता असते. एवंढच नाही तर सेलिब्रिटींचे लहानपणीचे फोटो पाहायलाही नक्कीच सर्वांना उत्सुकता असते.
बॉलिवूडमधील एका टॉप अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो चर्चेत
समोर पाहत असलेला लहान मुलाचा फोटो बॉलिवूडमधील एका टॉप अभिनेत्रीच्या बालपणीचा आहे. हा फोटो सध्या चर्चेत आहे. पण हा फोटो पाहून तिला ओळखणं मात्र कठीण आहे. बरं, चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सना कोणत्याही लूकमध्ये ओळखतात. पण जर ते त्यांच्या आवडत्या स्टार्सच्या बालपणीच्या फोटोंबद्दल असेल तर काहीवेळा अंदाज लावणं थोडं कठीण जातं. त्याच पद्धतीने या टॉप अभिनेत्रीचा हा व्हायरल झालेला् बालपणीचा फोटो पाहूनही तिलाही ओळखणे कठीण आहे.पण फोटोत दिसणारी ही अभिनेत्री सध्या बॉलिवूडमधील टॉपची आणि सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे.
या अभिनेत्रीला ओळखलंत का?
या फोटोत दिसणारी गोंडस छोटी मुलगी जिने गुलाबी रंगाचा टी-शर्ट घातला आहे. मुलांसारखे केस कापले आहेत किंवा याला कटोरी कट असंही म्हटलं जातं, मोठे डोळे असणारी ही निरागस मुलगी म्हणजे बॉलिवूडची टॉप अभिनेत्री दीपिका पदुकोण आहे, जी आता 39 वर्षांची आहे. आणि आज ही अभिनेत्री सर्व चाहत्यांच्या मनावर राज्य करते. बॉलिवूडमध्ये तिचं आपलं असं एक खास स्थान आहे. तिच्या एका झलकसाठी चाहते वेडे असतात. पण सुरुवातीला, फोटो पाहिल्यानंतर अंदाज येणं थोडं कठीण आहे.
View this post on Instagram
दीपिकाचा हा फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने तिच्या बालपणीचा हा गोंडस फोटो शेअर केला होता आणि फोटोला तिचे सर्वोत्तम बालपण म्हटलं होतं. पुन्हा एकदा दीपिकाचा हा फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. पण दीपिकाने या फोटोसह स्टोरी पोस्ट करून तिच्या बालपणीची ती आठवण सांगितली आहे. त्यामुळे तिच्या बालपणीच्या आठवणीतील फोटो म्हणून तिचे तो पोस्ट केला आहे कि खरंच तिचाच तो फोटो आहे याबद्दल ही चाहते प्रश्न विचारताना दिस त आहेत. पण दीपिकाच्या पोस्टवरून तरी तिचा बालपणीचा हेअरकट हा असाच होता एवढं मात्र स्पष्ट झालं आहे.
- Deepika Padukone childhood photo goes viral
या फोटोमध्ये चाहते तिच्या गोंडसपणाचे कौतुक करताना दिसत आहेत. दीपिकाचे नाव बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. तिने तिच्या कारकिर्दीत खूप प्रसिद्धी आणि संपत्ती मिळवली आहे. ती बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिकाची मालमत्ता सुमारे 500 कोटी रुपये आहे. ही अभिनेत्री एका चित्रपटासाठी 15 ते 30 कोटी घेते. आता दीपिका एका मुलीची आई देखील आहे, जिचे नाव तिने दुआ ठेवले आहे.
