AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भगव्या बिकिनीच्या वादावर अखेर दीपिकाने सोडलं मौन; काहीच न बोलता सगळं सहन करण्यामागचं सांगितलं कारण

‘बेशर्म रंग’ या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घातली होती आणि त्यावरूनच हा वाद निर्माण झाला होता. भाजपसोबतच विश्व हिंदू परिषद आणि इतर हिंदू संघटनांनी या चित्रपटाचा विरोध केला होता.

भगव्या बिकिनीच्या वादावर अखेर दीपिकाने सोडलं मौन; काहीच न बोलता सगळं सहन करण्यामागचं सांगितलं कारण
'पठाण'
| Updated on: Mar 02, 2023 | 10:01 AM
Share

मुंबई : बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दमदार पुनरागमन केलं. ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचले. प्रदर्शनाच्या बऱ्याच दिवसांनंतरही शाहरुख आणि दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ने दमदार कमाई केली. मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी त्याला बराच विरोध झाला होता. पठाणमधील ‘बेशर्म रंग’ हे गाणं जेव्हा प्रदर्शित झालं, तेव्हा देशभरातून त्याला विरोध झाला. या गाण्यातील एका दृश्यात दीपिका भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसली. त्यामुळे दीपिकाने सनातन धर्माचा अपमान केला, अशी टीका काही हिंदू संघटनांकडून झाली. इतकंच नव्हे तर या चित्रपटावर बहिष्काराचीही मागणी झाली. या सर्व वादादरम्यान शाहरुख आणि दीपिकाने मात्र मौन बाळगलं होतं. आता दीपिकाने यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

दीपिकाच्या बिकिनीमधील सीनवर आक्षेप घेत चित्रपटातून तो काढण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र चित्रपटातून हे दृश्य हटवलं गेलं नाही आणि निर्मात्यांनीही समोर येऊन कोणतंच स्पष्टीकरण दिलं नाही. विशेष म्हणजे पठाणच्या संपूर्ण टीमने चित्रपटाचं कोणत्याच प्रकारे प्रमोशन न करण्याचा निर्णय घेतला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकाने यामागचं कारण सांगितलं. गप्प राहून सर्वकाही सहन करण्याशिवाय दुसरा कोणता मार्ग समजत नव्हता, असं ती म्हणाली. चित्रपटासाठी केलेली इतक्या महिन्यांची मेहनत वाया घालवायची नव्हती, असंही तिने सांगितलं.

“मी आम्हा दोघांसाठी हे म्हणू शकत नाही. मात्र मला स्वत:ला दुसरा कोणता मार्ग दिसत नव्हता. मला असं वाटतं की आपल्याला ज्याप्रकारचे संस्कार मिळतात, आपण पुढे जाऊन तसंच वागतो. आम्ही मुंबईत एक स्वप्न घेऊन आलो होतो. आमच्याकडे फक्त कमिटमेंट, मेहनत आणि विनम्रताच होती आणि त्याच्याच जोरावर आम्ही इथवर पोहोचलो. अशा कठीण काळाला सामोरं जाणं हे फक्त अनुभवाने येऊ शकतं. आम्ही दोघं ॲथलीट होतो. त्याने शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना विविध खेळांमध्ये भाग घेतला होता हे मला आधी माहीत नव्हतं. मात्र हे खेळच तुम्हाला संयम शिकवतात”, असं दीपिका म्हणाली.

‘बेशर्म रंग’ या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घातली होती आणि त्यावरूनच हा वाद निर्माण झाला होता. भाजपसोबतच विश्व हिंदू परिषद आणि इतर हिंदू संघटनांनी या चित्रपटाचा विरोध केला होता. भगव्या रंगाची बिकिनी घालून बोल्ड सीन देत दीपिकाने सनातन धर्माचा अपमान केला, असा आरोप केला गेला.

Follow Us
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी