Deepika-Ranveer: ही तर पप्पाची कॉपी..; दीपिकाच्या लेकीला पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, शेअर केला रणवीरच्या बालपणीचा फोटो
Deepika Ranveer: दीपिका आणि रणवीरने त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच काही प्रमाणात प्रायव्हसी जपली आहे. त्यामुळे दुआसोबतचे असे खास क्षण समोर आले की चाहते त्यावर भरभरून प्रेम व्यक्त करतात. यावेळीही दुआच्या क्यूट अंदाजापासून तिच्या रणवीरसारख्या दिसण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

Deepika Ranveer: बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांची लेक दुआ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दीपिका आणि रणवीर यांनी सोशल मीडियावर काही खास कौटुंबिक फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये दुआचा निरागस अंदाज पाहून चाहते अक्षरशः फिदा झाले असून, अनेकांनी तिची तुलना थेट रणवीरसोबत केली आहे. दीपिका आणि रणवीर त्यांच्या मुलीला प्रसिद्धीपासून शक्य तितकं दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे दुआचे फोटो समोर आले की चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचते. यावेळीही तिचे फोटो सोशल मीडियावर येताच ते वेगाने व्हायरल झाले. विशेष म्हणजे, काही फोटोंमध्ये दुआचा चेहरा आणि तिचे हावभाव पाहून नेटकऱ्यांनी ती अगदी रणवीरसारखी दिसत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या ब्लॅक अँड व्हाइट फोटोंमध्ये ती आई-वडिलांसोबत एन्जॉय करताना दिसतेय. एका फोटोत ती आई दीपिकासोबत आहे, तर दुसऱ्या क्षणी रणवीरसोबत तिची गोड केमिस्ट्री पाहायला मिळते. तिच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य आणि खेळकर हावभाव चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी दुआच्या लुकची तुलना रणवीरच्या बालपणाशी केली. काही चाहत्यांनी तिला ‘लिटिल रणवीर’ असंही म्हटलं आहे.
पहा दुआचे फोटो-
View this post on Instagram
या खास फोटो अल्बममध्ये दीपिकाचा बेबी बंपही दिसत आहे. दीपिका आणि रणवीर पुन्हा एकदा आई-बाबा होणार आहेत. त्यामुळे या फोटोंमध्ये त्यांच्या वाढत्या कुटुंबाची झलकही चाहत्यांना पाहायला मिळाली. रणवीरनेही या खास पोस्टमधून त्याच्या कुटुंबासाठी मिळणाऱ्या प्रेमाबद्दल चाहत्यांचे आभार मानले. दुआ आणि आमचं मन आता आणखी मोठं होत आहे, तुमच्या आशीर्वादाबद्दल धन्यवाद, असं त्याने लिहिलं आहे.
Deepika’s genes didn’t even try because wdym m little Ranveer and Dua even have the same teeth 😭 pic.twitter.com/oPJRv0fGV0
— nysa (@chalkalaana) September 8, 2026
Ranveer’s tiny twin ❤️ pic.twitter.com/rVxKrIk9mK
— 🔱 (@dacoit_rvs) September 8, 2026
दीपिका आणि रणवीरची पहिली भेट एका पुरस्कार सोहळ्यात झाली होती. दीपिकाला पाहताचक्षणी रणवीर तिच्या प्रेमात पडला होता. मात्र ‘रामलीला’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये एकमेकांविषयी प्रेमाची भावना निर्माण झाली. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी दीपिका-रणवीरला एकत्र आणण्यात मोठी भूमिका बजावली, असं म्हटलं जातं. या दोघांनी रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. भूतकाळातील काही अनुभव पाहता दीपिका सुरुवातील लग्नाबाबत संभ्रमात होती. मात्र अखेर दोघांनी 2015 मध्ये गुपचूप साखरपुडा केला होता. याविषयीचा खुलासा रणवीरने ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये केला होता. जवळपास तीन वर्षांपर्यंत त्यांनी साखरपुड्याबाबत कमालीची गुप्तता पाळली होती.
