‘बेशर्म रंग’ गाण्याविषयी अखेर दीपिका पदुकोणने सोडलं मौन; ‘पठाण’च्या गाण्यांना फ्लॉप म्हणणाऱ्यांना डिवचलं

दीपिकाने सनातन धर्माचा अपमान केला, असा आरोप काही हिंदू संघटनांनी केला. या संपूर्ण वादावर आता पहिल्यांदाच दीपिकाची प्रतिक्रिया समोर आली आहे. यशराज फिल्म्सच्या युट्यूबवर दीपिकाच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

'बेशर्म रंग' गाण्याविषयी अखेर दीपिका पदुकोणने सोडलं मौन; 'पठाण'च्या गाण्यांना फ्लॉप म्हणणाऱ्यांना डिवचलं
PathaanImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Jan 24, 2023 | 11:36 AM

मुंबई: गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ‘पठाण’मधील ‘बेशर्म रंग’ हे पहिलं गाणं प्रदर्शित झालं. हे गाणं प्रदर्शित होताच पठाण वादाच्या भोवऱ्यात सापडला. यातील काही दृश्यांमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण भगव्या रंगाच्या बिकिनीत दिसली. यावरूनच हा वाद निर्माण झाला. दीपिकाने सनातन धर्माचा अपमान केला, असा आरोप काही हिंदू संघटनांनी केला. या संपूर्ण वादावर आता पहिल्यांदाच दीपिकाची प्रतिक्रिया समोर आली आहे. यशराज फिल्म्सच्या युट्यूबवर दीपिकाच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

पठाणमधील कोणतं गाणं तुला सर्वाधिक आवडतं असा प्रश्न तिला या मुलाखतीत विचारला गेला. त्यावर दीपिका म्हणाली, “पठाणमधील दोन्ही गाणी मला आवडतात. त्यातील एखादं निवडणं खूप कठीण आहे. कारण दोन्ही गाणी एकमेकांपासून खूप वेगळी आहेत. बेशर्म रंग या गाण्यासाठी मला खूप जास्त मेहनत घ्यावी लागली होती. कारण ते माझं सोलो गाणं होतं. ज्या ठिकाणी गाण्याची शूटिंग झाली, ते लोकेशनसुद्धा शूटिंगसाठी अवघड होतं. तिथे खूप थंडी आणि वारा होता. अशा हवामानात शूटिंग करणं कठीण असतं.”

“दोन्ही गाण्यांची शूटिंग करताना मला मजा आली. शाहरुख आणि मी जेव्हा एकत्र डान्स करतो तेव्हा खूप मजा आली. दोघांनाही डान्स चांगल्या पद्धतीने येत असल्याने स्टेप्स लक्षात ठेवणं अवघड नसतं. ही दोन्ही गाणी माझी आवडती आहेत. पण सर्वांत सुंदर बाब म्हणजे ही दोन्ही गाणी सुपरहिट ठरली”, असं ती पुढे म्हणाली.

हे सुद्धा वाचा

बेशर्म रंग या गाण्याची कोरिओग्राफी वैभवी मर्चंटने केली. तर शिल्पा रावच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं. बिकिनीच्या वादावर वैभवीनेही प्रतिक्रिया दिली होती. “बीचवर कोणीच अंगभर कपडे घालून जात नाही”, असं ती म्हणाली होती.

या गाण्यातील केमिस्ट्रीबद्दल बोलताना दीपिका म्हणाली, “बेशर्म रंग गाण्यातील चांगल्या केमिस्ट्रीचं श्रेय मला आणि शाहरुखला जातं. त्यावेळी शाहरुख डाएटवर होता आणि त्याला बराच वर्कआऊटसुद्धा करावा लागला. त्याची मेहनत गाण्यात दिसून येते.”

पठाण हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख आणि दीपिकासोबतच जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्या भूमिका आहेत.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.