AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2026 चा ब्लॉकबस्टर, 9.80 कोटी बजेट असणार्‍या या चित्रपटाने 15 दिवसांमध्ये केली 64.95 कोटी रुपयांची कमाई

चित्रपट असावा तर असा, 2026 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या 9.80 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये 15 दिवसांमध्ये केली 64.95 कोटी रुपयांची कमाई. सर्वत्र होतंय कौतुक.

2026 चा ब्लॉकबस्टर, 9.80 कोटी बजेट असणार्‍या या चित्रपटाने 15 दिवसांमध्ये केली 64.95 कोटी रुपयांची कमाई
| Updated on: Jun 06, 2026 | 1:00 PM
Share

Deool Band 2 Collection : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची सर्वाधिक चर्चा होत आहे आणि तो म्हणजे दिग्दर्शक-अभिनेता प्रवीण तरडे यांचा ‘देऊळ बंद 2’ चित्रपटाची. दमदार कथा, आध्यात्मिक आशय आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश मिळवले आहे. अवघ्या 15 दिवसांत चित्रपटाने कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित करत ब्लॉकबस्टरचा दर्जा मिळवला आहे.

बॉक्स ऑफिस विश्लेषक जेरिन जॉर्जकुट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘देऊळ बंद 2’ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत सुमारे 64.95 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली आहे. मराठी चित्रपटासाठी ही अत्यंत उल्लेखनीय कामगिरी मानली जात आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक प्रतिसाद

चित्रपटाला महाराष्ट्रात प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, राज्यातच चित्रपटाने 63.08 कोटी रुपयांची कमाई केली आहे. याशिवाय इतर राज्यांमध्येही चित्रपटाने चांगली कामगिरी केली आहे. 15 व्या दिवसापर्यंत गोव्यातून सुमारे 87 लाख रुपये, कर्नाटकातून 60 लाख रुपये, गुजरातमधून 37 लाख रुपये तर इतर भागांतून 3 लाख रुपये इतकी कमाई झाली आहे.

‘देऊळ बंद 2’चे बजेट केवळ 9.80 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. ‘देऊळ बंद 2’ हा 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट ‘देऊळ बंद’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात मोहन जोशी, स्नेहल तरडे आणि प्रवीण तरडे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेचा आणि आध्यात्मिक विचारांचा संदेश हलक्याफुलक्या आणि मनोरंजक शैलीत मांडण्यात आला आहे. चित्रपटाच्या कथानकाला आणि सादरीकरणाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे.

पहिल्या दिवसापासून दमदार सुरुवात

‘देऊळ बंद 2’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 2.45 कोटी रुपयांची नेट कमाई केली होती. तर पहिल्या विकेंडमध्ये चित्रपटाने 18.50 कोटी रुपयांचा नेट व्यवसाय करत आपली ताकद दाखवून दिली. त्यानंतरही चित्रपटाच्या कमाईचा वेग कायम राहिला.

‘जनता सिनेमा’चे संस्थापक आणि ट्रेड विश्लेषक युसुफ शेख यांनी चित्रपटाच्या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘मराठी चित्रपट ‘देऊळ बंद 2’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे. अवघ्या दोन आठवड्यांत चित्रपटाने सुमारे 50 कोटी रुपयांची कमाई केली असून, हा मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे.

Follow Us
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा
'मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश'
आशिष शेलार यांचे मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया