AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय म्हणतोय डोनाल्ड ट्रम्प? स्वामींचा राघव शास्त्रीला अमेरिकेत फोन; गश्मीरच्या धमाकेदार एण्ट्रीसोबत ‘देऊळ बंद 3’ची घोषणा

'देऊळ बंद 2' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून यामधील एक क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेता गश्मीर महाजनीने या चित्रपटात राघव शास्त्री म्हणून दमदार एण्ट्री केली आहे. अमेरिकेत काम करणाऱ्या राघवला स्वामींचा फोन येतो अन्..

काय म्हणतोय डोनाल्ड ट्रम्प? स्वामींचा राघव शास्त्रीला अमेरिकेत फोन; गश्मीरच्या धमाकेदार एण्ट्रीसोबत 'देऊळ बंद 3'ची घोषणा
Gashmeer Mahajani in Deool Band 2Image Credit source: Instagram
| Updated on: May 22, 2026 | 9:13 AM
Share

तब्बल 11 वर्षांनंतर प्रवीण तरडे यांच्या ‘देऊळ बंद’ या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 21 मे रोजी गुरुवारी ‘देऊळ बंद 2’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये प्रवीण तरडे यांची पत्नी आणि अभिनेत्री स्नेहल तरडे मुख्य भूमिकेत आहे. तर 2015 मध्ये अभिनेता गश्मीर महाजनी याने राघव शास्त्रीची मुख्य भूमिका साकारली होती. पहिल्या भागात स्वामी समर्थांची भूमिका साकारलेले अभिनेते मोहन जोशी आता दुसऱ्या भागातही स्वामींच्याच भूमिकेत परतले आहेत. ‘देऊळ बंद’ या चित्रपटाने मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत बॉक्स ऑफिसवर मोठा गाजावाजा केला होता. श्रद्धा विरुद्ध विज्ञान यांचा संगम असलेल्या या चित्रपटाने त्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. आता दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. विशेष म्हणजे या भागात राघव शास्त्रीचीही दमदार एण्ट्री झाली आहे.

सोशल मीडियावर चित्रपटातील एक क्लिप पहायला मिळतेय, ज्यामध्ये गश्मीर महाजनी पुन्हा एकदा राघव शास्त्रीच्या भूमिकेत परतला आहे. यावेळी तो अमेरिकेत आहे आणि तिथे त्याला चक्क स्वामींचा फोन येतो. “मी अक्कलकोटहून स्वामी समर्थ बोलतोय, तुला मी आठवतोय का”, असा सवाल ऐकताच तो थक्क होतो. ‘ओह माय गॉड’ असे उद्गार त्याच्या तोंडून निघतात तेव्हा स्वामी म्हणतात, “येस माय डार्लिंग, आय एम युअर गॉडच. काय म्हणतेय तुझी अमेरिका, काय म्हणतोय तुझा डोनाल्ड ट्रम्प?” यानंतर राघव शास्त्री आणि स्वामी समर्थ यांच्यातील संवाद पुढे चालू राहतो. राघव शास्त्रीच्या या एण्ट्रीसोबतच ‘देऊळ बंद 3’चीही घोषणा करण्यात आली आहे.

‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन या सर्वांची जबाबदारी प्रवीण विठ्ठल तरडे यांनीच सांभाळली आहे. त्यांच्या वास्तववादी मांडणीमुळे आणि प्रभावी लेखनशैलीमुळे हा चित्रपट अधिक प्रभावी ठरला आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या दैवी भूमिकेत झळकले असून, त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे. त्यांच्या प्रभावी संवादफेकीतून आणि भावनिक अभिनयातून श्रद्धेची ताकद प्रभावीपणे प्रकट होताना दिसते.

‘देऊळ बंद 2’मध्ये शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीतील ज्वलंत समस्या, त्यांच्या समोरील आर्थिक संकट आणि शेतकरी आत्महत्या यांसारख्या अत्यंत संवेदनशील मुद्द्यांना अधोरेखित करण्यात आलं आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन आणि अध्यात्म यांमधील संघर्षासोबतच देवाचं अस्तित्व आणि सामाजिक उत्तरदायित्व यांविषयीची मांडणी यात अत्यंत प्रभावीपणे करण्यात आली आहे.

Follow Us
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
Big Breaking | विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या राष्ट्रवादीत चाललंय तरी काय?
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना फोन केला अन्...
भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना ठाकरेंचा सवाल; दानपेटीची चोरी...
Aaditya Thackeray | दानपेटीची चोरी करणाऱ्यांसोबत जाणार का? भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना आदित्य ठाकरेंचा सवाल
भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
Pune | पुण्यात आज भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर..
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात मुख्यमंत्र्यांसह...
आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली; पालखी मार्गावर..
Alandi | पालखी मार्गावर महिलेचा हायव्होल्टेज राडा! आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट, काय झाली चर्चा?
कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर शेतकऱ्यांचं झाडावर चढून आंदोल
Mumbai Farmer Protest | शेतकऱ्यांचा संताप शिगेला! कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर झाडावर चढून आंदोलन
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने