AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सगळंच संपलं.., पुरात अडकली आई, पाण्याखाली गेलं घर; अभिनेत्रीला अश्रू अनावर

आसाममधील पुराची भयाण दृश्ये सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत. तिथल्या लाखो नागरिकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने एक व्हिडीओ शेअर करत तिचे कुटुंबीय पुरात अडकल्याची माहिती दिली आहे.

सगळंच संपलं.., पुरात अडकली आई, पाण्याखाली गेलं घर; अभिनेत्रीला अश्रू अनावर
देवोलिना भट्टाचार्जीImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 03, 2026 | 2:30 PM
Share

आसाममधील पूरस्थिती अत्यंत गंभीर झाली असून लाखो नागरिक या पुरामुळे बाधित झाले आहेत. विनाशकारी पुरामुळे लाखो लोकांचा बळी गेला आहे, तर अनेक जण पुरात अडकून पडले आहेत. बॉलिवूडपासून टेलिव्हिजनपर्यंतचे अनेक सेलिब्रिटी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. या पुराचा फटका ‘साथ निभाना साथियाँ’ या मालिकेत गोपी बहुची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीच्या कुटुंबालाही बसला आहे. नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती तिच्या आई आणि कुटुंबीयांबद्दल सांगताना भावूक झाली. देवोलिनाने सांगितलं की तिची आई, मावशी आणि आजी पुरात अडकल्या असून त्यांचं घर पाण्याखाली गेलं आहे. “जर मी याआधी याबद्दल बोलले असते, तर माझ्या भावनांवर माझं नियंत्रण राहिलं नसतं. म्हणूनच मी आतापर्यंत व्हिडीओ बनवू शकले नाही. कारण मला माहीत होतं की मी रडेन”, असं देवोलिना म्हणाली.

या व्हिडीओमध्ये ती पुढे सांगते, “शिवसागर आणि नाझिरा ही ती ठिकाणं आहेत, जिथे मी लहानाची मोठी झाले. माझा जन्म तिथेच झाला आणि माझं शालेय, महाविद्यालयीन शिक्षणही तिथेच झालं. मी आतापर्यंत व्हिडीओ न बनवण्याचं कारण हेच होतं की मला हे सर्व पाहून सहनच झालं नसतं. दुर्दैवाने माझी आई अजूनही नाझिरामध्ये अडकली आहे. पण देवाच्या कृपेने आमचं जुनं घर अशा भागात आहे, जिथे पूर्णपणे पुराचं पाणी शिरलेलं नाही. मात्र आजूबाजूच्या परिसराचं खूप मोठं नुकसान झालं आहे. माझ्या आजीचं आणि मावशीचं घर पूर्णपणे पाण्याखाली गेलं आहे. सर्वकाही उद्ध्वस्त झालं आहे. काहीच शिल्लक राहिलेलं नाही.”

देवोलिनाचा व्हिडीओ-

आसाममध्ये पुरामुळे अनेक घरं पाण्याखाली गेली असून लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं लागत आहे. “कष्टाने कमावलेलं सामान आणि त्यासोबतच्या आठवणी एका क्षणात पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. मी लोकांना आवाहन करते की त्यांनी आसाममधील पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन करते. या कठीण काळात लहान किंवा मोठी मदत एखाद्या कुटुंबाला आशेचा किरण दाखवू शकते”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली. देवोलिनाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Follow Us
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं