गोपी बहु अर्थात देवोलीना भट्टाचार्य लवकरच अडकणार विवाहबंधनात!

टीव्हीवरील प्रसिध्द मालिका 'साथ निभाना साथिया ' मधील गोपी बहु अर्थात देवोलीना भट्टाचार्य (Devoleena Bhattacharjee) लवकरच लग्नबंधणात अडकणार आहे.

गोपी बहु अर्थात देवोलीना भट्टाचार्य लवकरच अडकणार विवाहबंधनात!

मुंबई : टीव्हीवरील प्रसिध्द मालिका ‘साथ निभाना साथिया ‘ मधील गोपी बहु अर्थात देवोलीना भट्टाचार्य (Devoleena Bhattacharjee) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिने एका मुलाखती दरम्यान याचा खुलासा केला आहे. देवोलीना मुलाखतीमध्ये म्हणाली आहे की, मला माझ्या आयुष्यातील काही गोष्टी शेअर करायला आवडत नाहीत. त्यामुळे माझ्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव मी तुम्हाला सांगणार नाही पण मी पुढच्या वर्षी सर्व काही ठिक असेल तर लग्न करणार आहे. (Devoleena Bhattacharjee will get married)

 

View this post on Instagram

 

A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)

माझं मत अस आहे की, कोणतेही नाते टिकवण्यासाठी समजून घेण्याची गरज असते. देवोलीना बिग बॉस 14 मध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी चाहत्यांना त्यांच्या गोपी बहुचा एक वेगळा अवतार बघायला मिळाला होता. ‘बिग बॉसच्या घरात अर्शी खान आणि देवोलीना भट्टाचार्य यांच्या जोरदार वाद झाला होता. या वादामध्ये देवोलीना भट्टाचार्यने बिग बॉसच्या घरातील अनेक वस्तूंची तोडफोड केली होती, देवोलीनाने अर्शीच्या हातातील अन्न फेकून देते अर्शीला शिवीगाळही करताना दिसली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)

देवोलीना भट्टाचार्यचे हे रूप बघून घरातील इतर सदस्य आवाक झाले होते. अली गोनीने तिला समजवण्याचा प्रयत्न केला होता. देवोलीना जोरजोरात ओरडत म्हणाली होती की, अर्शी माझ्या घरच्यांविषयी बोलली आहे. देवोलीना तिचा मोर्चा बाथरूमकडे वळवला होता आणि तेथेही काही वस्तूंची मोडतोड करताना दिसली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)

देवोलीना अर्शीला शिव्या देताना विचित्र हातवारे करताना दिसली होती. गोपी बहु म्हणून प्रत्येक घरामध्ये पोहचलेल्या देवोलीना भट्टाचार्यचे हे रूप पाहुण प्रेक्षकांना धक्काच बसला आहे. अर्शीसोबतच्या भांडणामध्ये देवोलीना भट्टाचार्यने सर्व सिमा ओलांडल्या होत्या.

संबंधित बातम्या : 

राणा दग्गुबातीचा ‘हाथी मेरे साथी’ चित्रपट ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

‘तेजस’ चित्रपटात कंगना वायुसेना अधिकाऱ्याच्या भूमिकेत येणार प्रेक्षकांच्या भेटीला !

Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया, प्रकृती स्थिर

(Devoleena Bhattacharjee will get married)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI