राणा दग्गुबातीचा ‘हाथी मेरे साथी’ चित्रपट ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

दाक्षिणात्य सुपरस्टार राणा दग्गुबाती (Rana Daggubati) याचा ‘हाथी मेरे साथी’ (Haathi Mere Saathi) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

राणा दग्गुबातीचा 'हाथी मेरे साथी' चित्रपट ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार,  चाहत्यांची उत्सुकता शिगेला
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 11:07 AM

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार राणा दग्गुबाती (Rana Daggubati) याचा ‘हाथी मेरे साथी’ (Haathi Mere Saathi) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. राणाने याबाबतची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर केली आहे. तसेच 4 मार्चला चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. हा चित्रपट 26 मार्चला चाहत्यांच्या भेटीला येणार असून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. (Rana Daggubati’s ‘Haathi Mere Saathi’ will be released on March 26)

राणाच्या या पोस्टमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. हाथी मेरे साथी या चित्रपटाची कथा ही एका माणसाच्या आयुष्यावर आधारित आहे. ज्याने आयुष्यातील बराच काळ जंगलात घालवला आणि त्याचे आयुष्य पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी गेले आहे. माणूस आणि हत्ती यांच्यातील मैत्रीची ही गोष्ट आहे. ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटात राणा सोबत अभिनेतापुलकित सम्राट, विष्णु विशाल, अभिनेत्री श्रिया पिळगावकर, झोया हुसेन आहेत.

तर तमिळ चित्रपट दिग्दर्शक प्रभू सोलोमन या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शन करणार आहेत. राणानं बॉलिवूडमध्ये देखील अनेक चित्रपट केले. ज्यात त्यानं अभिनेत्री बिपाशा बासुसोबत काम केलं, खिलाडी अभिनेता अक्षय कुमारसोबतसुद्धा राणानं स्क्रिन शेअर केली. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये तर त्यानं कमालीचे अॅक्शन सीन दिलेत, यासाठी त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जातं.

कोरोना काळात राणा त्यांच्या लग्नामुळे खास चर्चेत होता. कोरोना काळात त्यानं मिहिका बजाजसोबत लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर यांच्या लग्नाचे फोटो ट्रेंडमध्ये होते.राणा दग्गुबातीने हाऊसफुल्ल 4, दम मारो दम, बेबी अशा हिंदी चित्रपटातही काम केले आहे. मात्र मुख्यत्वे तेलुगु आणि तमिळ सिनेमात तो झळकला. त्याचे वडील दग्गुबाती सुरेश बाबू हे तेलुगु चित्रपट निर्माते आणि वितरक आहेत.

संबंधित बातम्या : 

‘तेजस’ चित्रपटात कंगना वायुसेना अधिकाऱ्याच्या भूमिकेत येणार प्रेक्षकांच्या भेटीला !

Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया, प्रकृती स्थिर

Video : माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्यासोबत काम केलेल्या कलाकारावर रिक्षा चालवण्याची वेळ

(Rana Daggubati’s ‘Haathi Mere Saathi’ will be released on March 26)

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.