धर्मेंद्र यांनी अनेक वर्षांनंतर हेमा मालिनी यांच्यासोबतचा ‘तो’ व्हिडीओ केला पोस्ट, जुन्या आठवणी ताज्या करत म्हणाले…

Hema Malini - Dharmendra | हेमा मालिनी यांच्यासोबत खास आठवणी शेअर करत धर्मेंद्र म्हणाले..., दोघांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर म्हणाल..., धर्मेंद्र कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात. पण आता हेमा मालिनी यांच्यासोबत व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे चर्चाना उधाण...

धर्मेंद्र यांनी अनेक वर्षांनंतर हेमा मालिनी यांच्यासोबतचा 'तो' व्हिडीओ केला पोस्ट, जुन्या आठवणी ताज्या करत म्हणाले...
Follow us
| Updated on: Apr 03, 2024 | 1:14 PM

सुपरस्टार धर्मेंद्र सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत धर्मेंद्र चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. आता देखील धर्मेंद्र यांनी त्यांच्या आयुष्यातील खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. धर्मेंद्र यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त धर्मेंद्र – हेमा मालिनी यांच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. दोघांच्या व्हिडीओ चाहते लाईक्स आणि कमेंट करत प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत एका सिनेमातील सीनचा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘मित्रांनो मी शुटिंग करणं विसरून जातो जेव्हा भूमिका उत्तम असते…’ असं लिहिलं आहे. धर्मेंद्र यांनी व्हिडीओ पोस्ट करताच चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. चाहत्यांना देखील धर्मेंद्र – हेमा मालिनी यांचा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे.

हे सुद्धा वाचा

धर्मेंद्र – हेमा मालिनी यांच्या व्हिडीओवर कमेंट करत एक चाहता म्हणाला, ‘माइंड ब्लॉइंग…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘व्हिडीओ मस्तच आहे…’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘पंजाबी देशी स्टाईल अभिनय… मस्तच सर…’ चौथा नेटकरी म्हणाला, ‘गॉड गिफ्टेड अभिनेता…’ अशा अनेक कमेंट करत चाहत्यांनी धर्मेंद्र – हेमा मालिनी यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

धर्मेंद्र यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओबद्दल सांगायचं झालं तर, 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्रतीज्ञा’ सिनेमातील हा सीन आहे. सिनेमात धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यासोबत अजीत खान, अजीत देओल, जगदी आणि व्ही गोपाल मुख्य भूमिकेत होते. सिनेमाचं दिग्दर्शन दिग्दर्शक दुलाल गुहा यांनी केलं होतं.

‘प्रतीज्ञा’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील मोठा गल्ला जमवला… सिनेमात धर्मेंद्र यांनी साकारलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. आज देखील धर्मेंद्र यांचे अनेक सिनेमे चाहते आनंदाने आणि उत्सहाने पाहत असतात.

सांगायचं झालं तर, धर्मेंद्र – हेमा मालिनी यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. शोले, सीता और गीता, राजा और रानी आणि बगावत यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं. आज देखील दोघांच्या जोडीला चाहते विसरू शकलेले नाहीत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.