हेमा मालिनी नाही तर या अभिनेत्रीच्या प्रेमात वेडे होते धर्मेंद्र; लग्न करण्याची होती इच्छा….

धर्मेंद्र यांची हेमा मालिनीसोबतची प्रेम कहाणी सर्वश्रुत असली तरी त्यांना हेमा यांच्या आधी धर्मेंद्र या अभिनेत्रीच्या प्रेमात होते. त्यांना ही अभिनेत्री एवढी आवडायची कि त्यांना अभिनेत्रीशी लग्न करण्याची इच्छा होती. या अभिनेत्रीचे चित्रपट पाहण्यासाठी धर्मेंद्र मैलोन् मैल प्रवास करत असत.कोण होती ती अभिनेत्री?

हेमा मालिनी नाही तर या अभिनेत्रीच्या प्रेमात वेडे होते धर्मेंद्र; लग्न करण्याची होती इच्छा....
Dharmendra was madly in love with actress Suraiya, not Hema Malini wanted to get married
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 11, 2025 | 1:24 PM

धर्मेंद्र ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये असून त्यांच्या तब्येतीबद्दल विविध माहिती समोर येत आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.तथापि, सनी देओलच्या टीमने धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, धर्मेंद्र यांच्या चाहत्यांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण आहे. धर्मेंद्र यांनी त्यांच्या चित्रपटांनी एक काळ गाजवला. त्यांचे चित्रपट, अभिनय आणि त्यांचा देखणेपणा हा सर्वच चाहत्यांना भावत असे विशेषत: महिला चाहत्यांना. त्यांना बॉलिवूडचा ही-मॅन म्हणतात.

धर्मेंद्र यांचं चित्रपटांपेक्षाही वैयक्तिक आयुष्य जास्तच चर्चेत राहिलं

धर्मेंद्र यांचं चित्रपटांपेक्षाही वैयक्तिक आयुष्य जास्तच चर्चेत राहिलं आहे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची प्रेम कहाणी तर सर्वांनाच माहित आहे. पण हे फार कमी जणांना माहित असेल की ते हेमा मालिनी आधी एका दुसऱ्याच अभिनेत्रीच्या प्रेमात वेडे होते. त्यांना तिच्याशी लग्न करण्याचीही इच्छा होती.

धर्मेंद्रच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना, लाखो महिला त्याच्या चाहत्या होत्या. त्यांचा देखणा लूक आणि उत्कृष्ट अभिनयामुळे ते एक परिपूर्ण अभिनेते बनले . तरुण मुली त्याच्याशी लग्न करण्याचे स्वप्न पाहत होत्या, पण धर्मेंद्र चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीपासूनच त्यांचे एका अभिनेत्रीवर प्रेम जडलं होतं.

हेमा मालिनीआधी या अभिनेत्रीच्या प्रेमात होते धर्मेंद्र 

धर्मेंद्र यांनी स्वतः नायिकेवरील प्रेमाची कबुली दिली होती एवढंच नाही तर हे देखील केले होते की तिच्यामुळेच ते चित्रपट जगताकडे आकर्षित झाले होते. ती अभिनेत्री म्हणजे सुरैया. ज्यांनी त्यांच्या शानदार कारकिर्दीत असंख्य चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आणि असंख्य गाणी देखील गायली.

सुरैयांच्या पडद्यावरच्या अभिनयाने धर्मेंद्र फारच आकर्षित झाले होते. त्यांनी 1949 मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा “दिल्लगी” हा चित्रपट धर्मेंद्र यांनी 40 वेळा पाहिला होता. धर्मेंद्र यांनी कबूल केले की ते सुरैयाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तासंतास प्रवास करून जायचे.

अभिनेत्रीचं होतं या अभिनेत्यावर होतं प्रेम 

धर्मेंद्र सुरैयावर प्रचंड प्रेम करत होते. सुरैया यांना मात्र देव आनंद आवडत होते. त्यांचे देव आनंद आणि त्यांचे अफेअर 1948 ते 1951 पर्यंत टिकले. त्यांनी पळून जाण्याचा विचारही केला होता, परंतु त्यांच्या कुटुंबाच्या विरोधामुळे ते एकत्र येऊ शकले नाही. सुरैया यांनी पुन्हा लग्न केले नाही. तिने 1963मध्ये अभिनय जगतातून त्यांनी निवृत्ती घेतली.

धर्मेंद्रप्रमाणेच सुरैया यांची चित्रपटातील कारकीर्द यशस्वी झाली. त्यांनी 70 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि 338 गाणी गायली. देव आनंदसोबतची तिची जोडी लोकप्रिय ठरली होती.

धर्मेंद्र यांचे नाव सुपरस्टार मीना कुमारीशीही जोडले गेले होते नाव 

धर्मेंद्र यांचे नाव सुपरस्टार मीना कुमारीशीही जोडले गेले होते, परंतु हेमा मालिनीसोबतची त्यांची प्रेमकहाणी सर्वात जास्त चर्चेत होती. दोघांची पहिली भेट 1970 मध्ये आलेल्या “तुम हसीन मैं जवान” चित्रपटाच्या सेटवर झाली होती.

धर्मेंद्र आधीच विवाहित होते आणि त्यांना चार मुले होती, तरीही ते हेमा मालिनीच्या प्रेमात पडले आणि त्यांनी हेमा यांच्याशी लग्न केले. धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौरने घटस्फोट घेण्यास नकार दिल्यानंतर, अखेर धर्मेंद्र यांनी दुसरे लग्न करण्यासाठीच फक्त इस्लाम धर्म स्वीकारला आणि1980 मध्ये दोघांनी लग्न केलं.