AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra : धर्मेंद्र यांच्या निधनाच्या फेक न्यूज… हेमा मालिनी यांचा पाराच चढला; म्हणाल्या, अशा…

Dharmendra : धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवांवर हेमा मालिनी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहित त्यांनी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट दिली आहे. जे काही घडतंय ते अत्यंत अक्षम्य आहे, असं त्यांनी म्हटलंय.

Dharmendra : धर्मेंद्र यांच्या निधनाच्या फेक न्यूज... हेमा मालिनी यांचा पाराच चढला; म्हणाल्या, अशा...
Hema Malini and DharmendraImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 11, 2025 | 10:28 AM
Share

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवांवर त्यांची पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जे काही घडतंय ते अक्षम्य आहे, असं त्यांनी म्हटलंय. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर त्यांनी यासंदर्भात पोस्ट लिहित फेक न्यूज देणाऱ्यांना फटकारलं आहे. 89 वर्षीय धर्मेंद्र यांची सोमवारी दुपारपासून तब्येत नाजूक असल्याचं म्हटलं जात होतं. तर आज (मंगळवार) सकाळपासूनच त्यांच्या निधनाच्या अफवा पसरल्या होत्या. या अफवांवर आधी मुलगी ईशा देओलने पोस्ट लिहित स्पष्टीकरण दिलं होतं. त्यानंतर आता हेमा मालिनी यांचा पारा चढला. धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचं हेमा मालिनी यांनी सांगितलं आहे.

हेमा मालिनी यांची पोस्ट-

‘जे काही घडतंय ते अक्षम्य आहे. जी व्यक्ती उपचारांना प्रतिसाद देत आहे आणि बरी होत आहे त्यांच्याबद्दल जबाबदार चॅनेल्स अशा खोट्या बातम्या कशा पसरवू शकतात? हे अत्यंत अनादरपूर्ण आणि बेजबाबदार आहे. कृपया कुटुंबाचा आणि त्यांच्या गोपनीयतेचा योग्य आदर करा,’ अशा शब्दांत त्यांनी फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर राग व्यक्त केला आहे.

धर्मेंद्र यांना श्वसनाचा त्रास जाणवल्याने गेल्या काही दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सोमवारी त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली होती. इतकंच नव्हे तर ते व्हेंटिलेटरवर असल्याचंही म्हटलं गेलं होतं. हेमा मालिनी, सनी देओल आणि मुलगी इशा देओल हे धर्मेंद्र यांच्याबरोबर रुग्णालयात असल्याचं कळतंय. देओल कुटुंबीयांच्या खासगीपणाचा आदर करावा, असं आवाहन त्यांच्या माहिती जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

ईशा देओलची पोस्ट-

‘मीडिया अतिरेक करत असल्याचं दिसतंय आणि चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. माझ्या वडिलांची प्रकृती स्थिर असून ते बरे होत आहेत. आम्ही सर्वांना विनंती करतो की आमच्या कौटुंबिक खासगीपणाचा आदर करावा. वडिलांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते,’ अशी पोस्ट ईशा देओलने लिहिली आहे.

पंजाबमधील लुधियाना इथल्या एका गावात धर्मेंदर केवल कृष्ण देओल यांचा जन्म झाला होता. त्यांनी 1954 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी प्रकाश कौर यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतत प्रवेश केला. नंतर विवाहित असतानाच धर्मेंद्र हे अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले. प्रकाश कौर यांना घटस्फोट न देता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.