AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाहुबलीचं सिंहासन हमजाने उलथवलं; ‘धुरंधर 2’ने मोडला प्रभासचा 9 वर्षे जुना रेकॉर्ड

'धुरंधर 2'ने 'बाहुबली 2'ला चितपट केलं आहे. प्रभासच्या चित्रपटाचा नऊ वर्षे जुना रेकॉर्ड अखेर रणवीरने मोडला आहे. त्यावर आता 'बाहुबली'च्या निर्मात्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा रेकॉर्ड कोणता आहे, ते जाणून घ्या..

बाहुबलीचं सिंहासन हमजाने उलथवलं; 'धुरंधर 2'ने मोडला प्रभासचा 9 वर्षे जुना रेकॉर्ड
Ranveer Singh and PrabhasImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 30, 2026 | 1:57 PM
Share

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा चित्रपट दररोज कोणता ना कोणता विक्रम मोडतोय आणि सोशल मीडियावर फक्त त्याचीच चर्चा होत आहे. फक्त भारतातच नाही तर परदेशातही ‘धुरंधर 2’चा दबदबा पहायला मिळतोय. 19 मार्च 2026 रोजी हा चित्रपट जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला असून अवघ्या 10 दिवसांच्या आता त्याने बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट चित्रपटांनाही मात दिली आहे. या यादीत आता साऊथ सुपरस्टार प्रभासच्या ‘बाहुबली 2: द कन्क्लुजन’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाचाही समावेश झाला आहे. होय.. रणवीर सिंहच्या या चित्रपटाने ‘बाहुबली 2’च्या सिंहासनालाच उलथवलं आहे. आता ‘धुरंधर 2’ परदेशात सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे.

एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली 2’ हा चित्रपट उत्तर अमेरिकेत सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता. या चित्रपटाने उत्तर अमेरिकेत 20 दशलक्ष डॉलर म्हणजेच जवळपास 188 कोटी रुपयांचा गल्ला जमवत इतिहास रचला होता. गेल्या नऊ वर्षांपर्यंत ‘बाहुबली 2’चा हा रेकॉर्ड कोणीच मोडू शकला नव्हता. आता आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ या चित्रपटाने प्रभासच्या चित्रपटाचा हा रेकॉर्ड मोडत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. ‘बॉक्स ऑफिस मोजो’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘धुरंधर 2’ने आतापर्यंत उत्तर अमेरिकेत 22 दशलक्ष डॉलर म्हणजेच जवळपास 207 कोटी रुपये कमावले आहेत.

‘धुरंधर 2’च्या या मोठ्या यशावर आता ‘बाहुबली 2’च्या निर्मात्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. बाहुबलीच्या टीममधील निर्माते शोभू यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर लिहिलं, ‘बाहुबली 2 चा 9 वर्षे जुना रेकॉर्ड मोडल्याबद्दल आणि भारत, युएसए आणि जगभरात बॉक्स ऑफिस कमाईचे नवीन मापदंड प्रस्थापिक केल्याबद्दल आदित्य धर आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’च्या संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा.’

‘बाहुबील 2’चे निर्माते शोभू यार्लागड्डा यांनीसुद्धा ट्विट करत लिहिलंय, ‘कालच मी धुरंधर 2 हा चित्रपट पाहिला आणि मला हे सांगण्याची गरज नाही की तो मला खूपच आवडला आहे. मी हा चित्रपट खूप एंजॉय केला. या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडत भारतासह जगभरातील बॉक्स ऑफिसवर आपलं स्थान पक्कं करताना पाहून मला फार आनंद झाला. संपूर्ण टीमला शुभेच्छा.’

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा