AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन वर्षांच्या डेटिंगनंतर लिएंडर पेस – किम शर्माचं ब्रेकअप? लग्नाच्या चर्चांदरम्यान नेमकं कुठे बिनसलं?

लिएंडर पेसचं 2017 मध्ये रिया पिल्लईशी लग्न झालं होतं. पण काही काळातच दोघं विभक्त झाले. त्याचवेळी अभिनेता हर्षवर्धन राणे याच्यासमवेत किमच्या अफेअरची चर्चा झाली होती. किम शर्माला ‘मोहब्बतें’ या चित्रपटामुळे ओळख मिळाली.

दोन वर्षांच्या डेटिंगनंतर लिएंडर पेस - किम शर्माचं ब्रेकअप? लग्नाच्या चर्चांदरम्यान नेमकं कुठे बिनसलं?
Leander Paes And Kim Sharma Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 04, 2023 | 8:10 AM
Share

मुंबई : 2021 मध्ये जेव्हा टेनिस चॅम्पियन लिएंडर पेस आणि अभिनेत्री किम शर्मा यांना एकत्र पाहिलं गेलं तेव्हा दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं होतं. जिम सेशनपासून ते डिनर डेटपर्यंत या दोघांचे फोटो वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होऊ लागले होते. अखेर 5 सप्टेंबर 2021 रोजी किमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक रोमँटिक फोटो पोस्ट करत लिएंडरसोबतच्या रिलेशनशिपची जाहीर कबुली दिली. गेल्या दोन वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. मात्र आता या दोघांमध्ये काही आलबेल नाही, असं समजतंय. लिएंडर आणि किम यांचा ब्रेकअप झाल्याची माहिती समोर येत आहे.

काही दिवसांपूर्वी या दोघांच्या लग्नाच्या चर्चा होत्या. मात्र कमिटमेंट संबंधित समस्यांमुळेच त्यांच्या नात्यात कटुता आल्याचं कळतंय. अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण अलाना पांडेच्या लग्नातसुद्धा किम एकटीच दिसली होती. त्याचसोबत 28 मार्च रोजी आपल्या दुसऱ्या डेटिंग अॅनिव्हर्सरीलाही दोघांनी सोशल मीडियावर कोणताच पोस्ट अपलोड केला नव्हता. 2022 मध्ये लिएंडरने सोशल मीडियावर किमसोबतचे फोटो पोस्ट करत जाहीर प्रेम व्यक्त केलं होतं. ‘हॅपी अॅनिव्हर्सरी किम. 365 दिवसांच्या आठवणी आणि प्रत्येक दिवशी माझ्यासोबत असल्याबद्दल धन्यवाद’, असं त्याने लिहिलं होतं.

View this post on Instagram

A post shared by Leander Paes (@leanderpaes)

किम आणि लिएंडर यांना अनेकदा डिनर डेटला, पार्टीला एकत्र जाताना पाहिलं गेलंय. दोघांनी एकमेकांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली आहे. गेल्या वर्षी हे दोघं फ्लोरिडामधील वॉल्ट डिस्ने वर्ल्डला फिरायला गेले होते. तर जानेवारी महिन्यात किमचा वाढदिवस दोघांनी बहामासमध्ये साजरा केला. गेल्या वर्षी किम शर्मा आणि लिएंडर पेसच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. या दोघांच्या पालकांनीही लग्नास होकार दिल्याचं म्हटलं जात होतं. दोघांच्या कुटुंबीयांची अनेकदा भेटही झाली होती. किम आणि लिएंडर डेस्टिनेशन वेडिंग करणार नसून साधेपणानं कोर्ट मॅरेज करणार असल्याचंही वृत्त होतं.

लिएंडर पेसचं 2017 मध्ये रिया पिल्लईशी लग्न झालं होतं. पण काही काळातच दोघं विभक्त झाले. त्याचवेळी अभिनेता हर्षवर्धन राणे याच्यासमवेत किमच्या अफेअरची चर्चा झाली होती. किम शर्माला ‘मोहब्बतें’ या चित्रपटामुळे ओळख मिळाली. यानंतर तिने ‘तुम से अच्छा कौन है’, ‘जिंदगी रॉक्स’, ‘मनी है तो हनी है’ अशा चित्रपटांमध्ये काम केलं. परंतु तिला हवं तितकं यश मिळू शकलं नाही.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.