AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अत्यंत वेदनादायी अभिनेत्रीचा मृत्यू,9 वर्ष होती अंथरुणाला खिळून, पण शेवटची इच्छा राहिली अपूर्ण

Bollywood Actress : सौंदर्याने जिने इंडस्ट्रीवर राज्य केलं... शेवटच्या क्षणी मात्र तिच्यासोबत कोणीच नव्हत... 9 वर्ष गंभीर आजारांचा सामना केल्यानंतर घेतला अखेरच्या श्वास, नाही झालं शेवटचं स्वप्न पूर्ण... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या निधनाची चर्चा...कोण आहे ती?

अत्यंत वेदनादायी अभिनेत्रीचा मृत्यू,9 वर्ष होती अंथरुणाला खिळून, पण शेवटची इच्छा राहिली अपूर्ण
| Updated on: Nov 22, 2023 | 9:21 AM
Share

मुंबई | 22 नोव्हेंबर 2023 : बॉलिवूड विश्वाचं आकर्षण अनेकांना असतं… आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक कलाकार मायानगरी मुंबईत येतात… काहींची स्वप्न पूर्ण होतात… तरी काहींच्या वाट्याला निराशा येत असते… बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी मेहनत आणि जुद्दीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं. अनेक सेलिब्रिटी असे देखील आहेत, ज्यांना प्रोफेशनल आयुष्यात यश मिळालं पण खासगी आयुष्यात मात्र त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दिवंगत अभिनेत्री मधुबाला…

अभिनेत्री मधुबाला यांनी त्यांच्या सौंदर्याने फक्त चाहत्यांना नाही तर, अनेक सेलिब्रिटींना देखील घायाळ केलं. हिंदी विश्वातील मधुबाला यांचं स्थान अद्याप इंडस्ट्रीमध्ये कोणतीही अभिनेत्री घेऊ शललेली नाही. मधुबाला यांचं अप्रतिम सौंदर्य आणि अभिनयावर संपूर्ण बॉलिवूड आणि चाहते फिदा होते. आजही चाहत्यांमध्ये मधुबाला यांच्या चर्चा रंगलेल्या असतात.

अत्यंत वेदनादायी होतं मधुबाला यांचं निधन

मधुबाला आज जिवंत नसल्या तरी, चाहत्यांच्या मनात त्या आजही आहेत. एक काळ असा होता जेव्हा मधुबाला यशाच्या शिखरावर होत्या. त्यांचं फिल्मी करियर प्रचंड उत्तम होतं. पण तितकाच खडतर त्यांचा अखेरचा प्रवास होता. मधुबाला यांचं निधन अत्यंत वेदनादायी होतं. शेवटच्या दिवसांमध्ये त्या पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या. फार कमी वयात मधुबाला यांनी अखेरचा श्वास घेतला.

9 वर्ष अंथरुणाला खिळून होत्या मधुबाला

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मधुबाला अनेक आजारांनी त्रस्त होत्या. त्यामुळे त्यांच्या शरीरात रक्ताचे प्रमाण दिवसागणिक वाढू लागलं होतं. अशा अवस्थेत डॉक्टर रोज त्यांच्या घरी यायचे आणि शरीरातून रक्त काढायचे. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. शेवट्या श्वासापर्यंत मधुबाला आजारांचा सामना करत होत्या.

रिपोर्टनुसार, दिवसागणिक त्यांची प्रकृती नाजून होत गेली. कधी श्वास घेण्यासाठी त्यांना त्रास होत होता, तर कही सतत खोकला… अशा गंभीर परिस्थिती त्या 9 वर्ष अंथरुणाला खिळून होत्या…. अनेक कठीण परिस्थितींचा सामना केल्यानंतर मधुबाला यांनी अखेरचा श्वास घेतला आणि जगाचा निरोप घेतला.

अपूर्ण राहिली शेवटची इच्छा

मधुबाला यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण त्यांना दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या ‘बिराज बहू’ सिनेमात काम करायचं होतं. सिनेमात काम करण्यासाठी मधुबाला यांनी अनेक प्रयत्न केले. पण त्यांची इच्छा पूर्ण होवू शकली नाही. अखेर मधुबाला यांची शेवटची इच्छा मात्र इच्छाच राहिली.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.