AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranpati Shivray : ‘रणपती शिवराय’मधील महाराजांच्या भूमिकेसाठी चिन्मय मांडलेकर का नाही? दिग्पाल लांजेकरांनी सांगितलं मोठं कारण

Ranpati Shivray : दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी अभिजीत श्वेतचंद्र याची महाराजांच्या भूमिकेसाठी का केली निवड? नक्की काय काय झालं ते घ्या जाणून... सध्या सर्वत्र 'रणपति शिवराय स्वारी आग्रा’ सिनेमाची चर्चा...

Ranpati Shivray : 'रणपती शिवराय'मधील महाराजांच्या भूमिकेसाठी चिन्मय मांडलेकर का नाही? दिग्पाल लांजेकरांनी सांगितलं मोठं कारण
Chinmay Mandlekar
| Updated on: Jan 11, 2026 | 1:35 PM
Share

Ranpati Shivray : मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी सिनेमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आणि प्रेक्षकांनी देखील त्यांना महाराजांच्या भूमिकेत डोक्यावर घेतलं. ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ यांसारख्या सिनेमांमधील “गड आला, पण सिंह गेला” आणि “आपण रायगड जिंकणार” यांसारखे डायलॉग आजही प्रेक्षकांच्या मनात कोरले गेले आहेत. पण आता लवकर प्रदर्शित होत असलेल्या ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ सिनेमा मांडलेकर महारांज्या भूमिकेत दिसणार आहे. तर आता महाराजांच्या भूमिकेत अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र दिसणार आहे.

सांगायचं झालं तर, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांच्या अनेक सिनेमांमध्ये चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसले. पण मध्यंतरी त्यांच्या मुलाच्या नावाच्या झालेल्या वादावरून चिन्मय यांनी यापुढे महाराजांची भूमिक साकारणार नसल्याचा निर्णय घोतला. याच कारणामुळे लांजेकर यांनी अभिजीत श्वेतचंद्र याची निवड केली.

View this post on Instagram

A post shared by Lokmat Filmy (@lokmatfilmy)

यावर लांजेकर म्हणाले, ‘अभिजीत याने याआधी माझ्यासोबत जवळपास 4 सिनेमांमध्ये काम केलं. त्याची मेहनत, प्रामाणिकपणा आणि आमच्या टीमच्य कार्याबद्दलचा त्याचा आदर… फक्त शब्दातून नाही तर, त्याच्या कृतीतून सुरु आहे… तो डोंबिवलीत राहतो आणि पुण्याता रिहर्सलला यतो. ज्यासाठी जवळपास दोन ते अडीच तास लागतात.’

पुढे लांजेकर म्हणाले, ‘भूमिकेसाठी त्याची वेगवेगळ्या पद्धतीने जवळपास 10 – 12 लूक टेस्ट झाल्या. AI चा वापर करुन दाढी – मिशी सर्व लूकटेस्ट पुणे – मुंबईत झाल्या. या सगळ्यात तो न चुकता हजर राहत होता . हे सगळ काही तो, त्याचं घरदार सोडून… चालू असलेल्या मालिकेतून वेळ काढून तो करत होता… एक क्षण असा आला जेव्हा त्याने मालिका सोडून दिली..’ असं देखील दिग्पाल लांजेकर म्हणाले. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा चित्रपट येत्या 30 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तर चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरलाच जावं लागेल; धंगेकर बरसले
तर चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरलाच जावं लागेल; धंगेकर बरसले.
मराठी भाषेसाठी लँग्वेज लॅब तयार करणार - देवेंद्र फडणवीस
मराठी भाषेसाठी लँग्वेज लॅब तयार करणार - देवेंद्र फडणवीस.
राष्ट्रवादीसोबत तुम्हीच गेले होते ना? शिरसाटांचा ठाकरेंना थेट प्रश्न
राष्ट्रवादीसोबत तुम्हीच गेले होते ना? शिरसाटांचा ठाकरेंना थेट प्रश्न.
गुंडशाही दडपशाहीमुळे जगणे मुश्किल! अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
गुंडशाही दडपशाहीमुळे जगणे मुश्किल! अंबादास दानवेंचा गंभीर आरोप.
कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरु करणार
कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरु करणार.
नवी मुंबई ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत वॉटर टॅक्सी; फडणवीसांची घोषणा
नवी मुंबई ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत वॉटर टॅक्सी; फडणवीसांची घोषणा.
ठाकरेंचा टोमणेनामा, आमचा विकासनामा! एकनाथ शिंदेंचा टोला
ठाकरेंचा टोमणेनामा, आमचा विकासनामा! एकनाथ शिंदेंचा टोला.
मुंबईला रोहिंग्यांपासून मुक्त करणार! देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन
मुंबईला रोहिंग्यांपासून मुक्त करणार! देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन.
सोलापूरमध्ये शिंदे गटाला धक्का;दादा पवारंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
सोलापूरमध्ये शिंदे गटाला धक्का;दादा पवारंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश.
वचननामा मुंबईकरांसाठी बदल घडवणारा ठरेल! शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
वचननामा मुंबईकरांसाठी बदल घडवणारा ठरेल! शिंदेंनी व्यक्त केला विश्वास.